
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) बाजी मारणारे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) आता कोणती राजकीय वाट निवडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. सत्यजीत तांबे यांनी उद्या ४ फेब्रुवारी रोजी आपली राजकीय भूमिका जाहीर करण्याची घोषणा केलेली आहे. तर दुसरीकडे त्यांचे वडील सुधीर तांबे यांनी ‘सत्यजीतने अपक्षच रहावे’ असा वडीलकीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सत्यजीत स्वतःचा निर्णय स्वतःच घेणार की वडीलकीचा सल्ला ऐकणार याकडे आता लक्ष लागलेले आहे. भाजपने त्यांना पक्षात येण्याची ऑफर यापूर्वीच दिले
ली असताना काँग्रेसची भूमिका देखील काहीशी मवाळ झाल्याचे दिसत आहे.
काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढविली. भाजपने त्यांना छुपा पाठिंबा दिला. मविआच्या शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे अशी थेट लढत होऊन तांबे यांनी त्यांचा सहज पराभव केला. आता सत्यजीत तांबे यांची पुढची वाटचाल कशी राहणार, याकडे लक्ष लागलेले आहे. भाजपने त्यांना पक्षात येण्याची थेट ऑफरच दिलेली आहे. ते भाजपमध्ये आल्यास भाजपला फायदाच होणार आहे. तर काँग्रेसने देखील त्यांचे निलंबन रद्द करण्याचे संकेत दिले आहेत. याबद्धल पक्षनेतृत्व निर्णय घेईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. तर सत्यजीत यांच्या वडीलांना त्यांना अपक्ष म्हणून कायम राहण्याचा सल्ला दिलाय. उद्या शनिवारी सत्यजीत तांबे आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.