
केपटाऊन-भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराज याने पुन्हा कमाल केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात मोहम्मद सिराजने ६ बळी घेतल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ ५५ धावांत गारद झाला. दक्षिण आफ्रिकेला केवळ २३.२ षटकेच फलंदाजी करता आली. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून काईल व्हॅरियनने १५ आणि डेव्हिड बेडिंगहॅमने १२ धावा केल्या. उर्वरित फलंदाजांना १०० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात एकही सत्र खेळू शकला नाही. भारताविरुद्धची ही संघाची सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी २०१५ मध्ये नागपूरच्या मैदानावर संघाला केवळ ७९ धावा करता आल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेत याआधी २००६ मध्ये संघ ८४ धावांवर बाद झाला होता.
Related posts:
महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
May 23, 2026Artical Blog
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
















