नागपूर -| भाजपाने या लोकशाही प्रधान देशात असलेल्या अनेक रूढी परंपरा मोडीत काढण्याचा सपाटा लावला आहे. राष्ट्रपती अभिभाषण करतात ही प्रथा आहे त्याला पण मोडून टाका असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी नागपूरात पत्रकार परिषदेत केले. उद्या होणारे संसद भवन इमारत उद्घाटन कार्यक्रमाबाबत वल्लभ म्हणाले की, संसद हे एक मंदिर आहे या मंदिराचे उद्घाटन करण्याचा अधिकार देशाच्या प्रत्येक नागरिकाला नाही, राष्ट्रपतींना आहे. मुळात संसदेची कार्यवाही तेव्हाच सुरू होते. जेव्हा राष्ट्रपती अभिभाषण करतात. मग ही प्रथा आहे त्याला पण मोडून टाका. संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमात 20 विरोधी पक्ष बहिष्कार करीत त आहेत. ही काही लहान बाब नाही, किंबहुना ही मोठ्या शरमेची बाब आहे.
नितीन गडकरी यांच्या आज वाढदिवस निमित्ताने त्यांना पण चिमटा काढला. ते म्हणाले,आम्हाला माहिती आहे की रोज 38 KM चे रोड कसे निर्माण होतात. दोन पदरी रस्त्याला चार पदरी कसे करतात. विंडो ड्रेसिंग आणि क्रिएटिव्ह अकाऊंट करू नये, आम्हाला सर्व माहिती आहे असेही ते म्हणाले.
















