बुलढाण्यात बीआरएसची दमदार एन्ट्री, नेणार 50 सरपंचांना तेलंगाणा

0

 

बुलढाणा – अब की बार किसान सरकार हा नारा देवून तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात उतरला आहे, हा पक्ष महाराष्ट्रात नवीन आहे तो काय करू शकतो अशा चर्चा या पक्षा बाबत होत असताना बीआरएस पक्षाने आपली पाळेमुळे ग्रामीण भागात रुजवण्यााठी सुरुवात करण्यात आली आहे, बुलढाणा जिल्ह्यात ग्रामीण भागात बीआरएस पक्षाने युद्ध पातळीवर आपले काम सुरू केले आहे.
हैद्राबाद येथून आलेल्या बीआरएस पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा पिंजून काढला असून तेलंगणाच्या विकास मॉडेल अभ्यासासाठी बुलढाणा जिल्ह्यातून 50 सरपंचांना तेलंगाणा येथे नेवून तिथला विकास कसा झाला हे दाखवण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात बीआरएस पक्षाच्या नेत्यांनी शेतकरी आणि सरपंच्यांच्या भेटी गाठी घेणे सुरू केले आहे. एकंदरीत बिआरएस ने बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला असून जिल्ह्यात मोठ्या ताकदीने पक्ष रूजवण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या राजकीय पक्षाच्या राजकारणाच्या वातावरणात बीआरएसची ही दमदार एन्ट्री झाली आहे.