बुलढाणा – शेगावचे योगिराज संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे विदर्भात आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेजवळ म्हणजे सिंदखेडराजा येथे जालन्यातून आज आगमन झाले. पंढरपूरला आषाढी वारीसाठी ही पालखी शेगाव येथून रवाना झाली होती. आता पंढरपूर येथून आषाढी एकादशीचा उत्सव संपल्यावर श्री गजानन महाराज यांची पालखी शेगावकडे रवाना झाली आहे. शेकडो वारकरी, भजन दिंड्या,घोडे, वाहने यांच्यासह वाजत -गाजत भजन म्हणत गजानन महाराज यांची पालखी जिल्ह्यात परतली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर फटाके फोडून पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ही पालखी सिंदखेडराजा येथे आज मुक्काम करेल आणि मग ही श्रीक्षेत्र शेगावकडे प्रस्थान करणार आहे.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















