बुलढाणा BULDHANA – 19 जानेवारीला आम्ही मुंबई-दिल्ली-गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे अडविणार आहोत. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात. केंद्र आणि राज्य सरकार सत्तेच्या मस्तीत असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर Ravikant Tupkar यांनी केले.
मुख्यमंत्री निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभर फिरत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात त्यांना दिल्लीला जायला वेळ नाही. दौरे करून हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांचा संयम आता संपलेला आहे.18 जानेवारी पर्यंत सरकारची पुन्हा एकदा वाट बघू. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत मलकापूर रेल्वे स्टेशनवरील एकही ट्रेन जाऊ देणार नाही असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.