
“स्किल्स ऑन व्हील्स – कौशल वाहिनी” चे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
सोलर इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि. चा सीएसआर प्रकल्प
नागपूर NAGPUR 14 जानेवारी 2024 – भारत हा सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. ग्रामीण युवकांना डिजिटली साक्षर केल्यास रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल, असे केंद्रीय मंत्री NITIN GADAKARI नितीन गडकरी यांनी सांगितले. “स्किल्स ऑन व्हील्स – कौशल वाहिनी” “Skills on Wheels – Kaushal Vahini” च्या फ्लॅग ऑफ समारंभात ते उपस्थितांना संबोधित करत होते. हे डिजिटली सुसज्ज वाहन हा सोलर इंडस्ट्रीज इंडिया प्रा.लि.चा द इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स सोसायटी (ICES) च्या सहकार्याने सुरु करण्यात आलेला CSR प्रकल्प आहे.
सोलर इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि. ने द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजीनियर्स (ICES) च्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या “स्किल्स ऑन व्हील्स – कौशल वाहिनी” या परिवर्तनशील सीएसआर प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. एनरिको हाइट्स, जयप्रकाश नगर येथे झालेल्या या कार्यक्रमाला सत्यनारायण नुवाल, अध्यक्ष, सोलर इंडस्ट्रीज लिमिटेड, डॉ. एस.एल. स्वामी, अध्यक्ष, ICES यांच्यासह नगर पंचायत कोराडी येथील राजेश रंगारी, आयसीईएसच्या महासंचालक माया ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते.
नितीन गडकरी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करताना म्हणाले, ICES सह सोलार इंडस्ट्रीज या उपक्रमामुळे या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणेल असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेशी जुळवून घेत एका नव्या युगाची सुरुवात ‘स्किल्स ऑन व्हील्स-कौशल वाहिनी’ हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे झाली असून यामुळे जीवन आणि समुदायामध्ये मोठ्या बदल घडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोलर इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सक्षमीकरणाच्या महत्त्वावर भर दिला. नितीन गडकरी यांनी दिलेल्या पाठिंब्याचे आणि मार्गदर्शनाचे त्यांनी आभार मानले. तर डॉ.एस.एल. स्वामी, अध्यक्ष ICES यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की तीन महिन्यांत 1200 तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणामध्ये मूलभूत संगणक ते सायबर सुरक्षा यांचा समावेश असेल. तसेच, पालकांना सायबर साक्षरतेबाबत जागरूक केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
अशी आहे कौशल वाहिनी
नागपूर आणि आसपासच्या भागातील तरुणांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवण्यावर सोलार इंडस्ट्रीजने अत्याधुनिक सानुकूलित बस म्हणजेच ‘कौशल वाहिनी’ तयार केली असून ती संगणक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेली साधने आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहे. , आडासा, बडेगाव, धापेवाडा, कामठी, खापा आणि कोराडीपर्यंत ही कौशल वाहिनी जाणार आहे. कौशल वाहिनी प्रत्येक ठिकाणी सात दिवस तैनात राहील व तेथील प्रत्येकी 30 सहभागींच्या पाच तुकड्यांना प्रशिक्षण देईल. प्रत्येक स्थानावर एकूण अंदाजे 150 उमेदवार आणि सुमारे 1200 प्रशिक्षणार्थींचा त्यात समावेश असेल. ICES यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्रे देईल, त्यांच्या क्रेडेन्शियलला समर्थन देईल आणि त्यांची रोजगारक्षमता वाढवेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी गलांडे हिने केले.