
काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milind Deora) शिंदे गटात (Shinde Group) जाणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात (Maharashtra Politicle Updates) जोर धरला आहे. अशातच मिलिंद देवरा यांनी काँग्रेस (Congress) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. देवरा यांच्या पक्षपदाच्या राजीनाम्यामुळे आजच ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलीय. ट्विट करत त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती दिलीय. काँग्रेस पक्षात देवरा यांचं मोठं नाव आहे. देवरा कुटुंबाचा काँग्रेस पक्षासोबत मागचे 55 वर्षे स्नेह राहिला. पण आज मिलिंद देवरा यांनी पाच दशकं जुन्या या नात्याला पूर्णविराम दिला.
काँग्रेसला रामराम केल्यानंतर मिलिंद देवरा यांनाी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका वाक्यात देवरा यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी विकासाच्या मार्गावर जात आहे, असं मिलिंद देवरा म्हणालेत.
मिलिंद देवरा यांनी सिद्धिविनायक मंदिरात जात दर्शन घेतलं. रविवारी दुपारी 2 वाजता मिलिंद देवरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील.
दक्षिण मुंबईत होल्ड असणारे वरिष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. ट्विट करत देवरा यांनी आज सकाळी राजीनाम्याची घोषणा केली. मागच्या 55 वर्षांपासून देवरा कुटुंब काँग्रेस पक्षाशी जोडलेलं होतं. मात्र आता काँग्रेसमधील प्रवास थांबवत आहे, असं ट्विट करत मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मी काँग्रेस पक्षातील नेत्यांचे आणि कार्यकऱ्यांचे मनापासून आभार मानतो, असंही देवरा म्हणालेत.