
सोलापूर SOLAPUR -ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने फरशी पुलावरून ऊसाचा ट्रक थेट पाण्यात कोसळल्याची घटना घडली आहे. दुर्घटनेमध्ये ट्रक चालक हा गंभीरित्या जखमी झाला वाहकाने प्रसंगावधान राखत ट्रक मधून उडी घेतल्यामुळे त्याचा जीव बचावला आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर सामोडे परिसरात ही घटना घडली.
या रस्त्याचे काम चालू असल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात नेहमी या ठिकाणी घडत असतात. मावा मार्गावरील इतर वाहन चालकांनी तसेच परिसरातील नागरिकांना हा सर्व प्रकार लक्षात येताच घटनास्थळी धाव घेत ट्रकमध्ये अडकलेल्या ट्रक चालकास मोठ्या शर्तीच्या प्रयत्नानंतर बाहेर काढले असून, त्यास शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी यावेळी दिली आहे.