महायुतीच्या मेळाव्यात आ कडू यांनी का फिरविली पाठ?

0

 

अमरावती- लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections अनुषंगाने महायुतीच्या वतीने अमरावतीमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात झाली. मात्र, शहरात असूनही प्रहारचे आमदार BACCHU KADU  बच्चू कडू यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली, यामुळे चर्चेला उधाण आले.
महायुतीचे घटक पक्ष म्हणून भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष, प्रा. जोगेंद्र कवाडे यासह घटक पक्षातील कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचा उमेदवार कोण? याविषयी कार्यकर्ते व नेते आपले मत मांडणार असल्याने राजकिय वर्तुळात उत्सुकता होती. मेळाव्याला युवा स्वाभिमानकडून आमदार रवी राणा, भाजपकडून आमदार प्रवीण पोटे, शिंदे गट माजी आमदार अभिजित अडसूळ, राष्ट्रवादी अजित पवार गट संजय खोडके, प्रहारतर्फे पवन वसू यांचेसह 15 पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.