
लाॅयन्स क्लब नागपूर Lions Club Nagpur शाखा ३२३४ला रिजन चेअरपर्सन भेट व सदस्य स्नेहमीलन कार्यक्रम रविवारी पार पडला.
नागपूर येथील ॲम्ब्रोशिया फार्मस् येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात लाॅयन्स क्लबच्या नवीन सदस्यांना कल्बचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. सुरुवातीला अध्यक्ष नितीन वर्मा यांनी लाॅयन्स क्लबच्या मागील कालावधीतील कार्याचा अहवाल सादर केला. रजनीश जैन यांनी आर्थिक तर प्रिती भैय्या यांनी कार्यवृत्त सादर केले.
रिजन चेअरपर्सन अनिल मॅथ्यू यांनी लाॅयन्स क्लब शाखा ३४३२च्या एकूणच कार्य व प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख करीत संस्थेच्या ज्येष्ठ सदस्य राजेश जिंदल, राजेश जसोरे यांच्यासह अध्यक्ष नितीन वर्मा व पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
क्लबचे नवीन सदस्य सुनील कुहीकर, राखी कुहीकर, डॉ. पल्लवी भगत, कमल महाजन, अंकीत सोबती, शारदा महाजन, पोर्णिमा राऊत Sunil Kuhikar, Rakhi Kuhikar, Dr. Pallavi Bhagat, Kamal Mahajan, Ankit Sobti, Sharda Mahajan, Poornima Raut यांना अनिल मॅथ्यू यांनी विधिवत सदस्यत्व बहाल केले.
प्रिती भैय्या यांच्या आभारप्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.