रामदेव बाबा यांच्या वक्तव्याच्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक

0

 

नागपूर

NAGPUR  – रामदेव बाबा यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात आज रविवारी नागपुरातील ओबीसी संघटना रस्त्यावर उतरून रामदेव बाबांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. नागपुरातील जगनाडे चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी रामदेव बाबा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. परमेश्वर राऊत, नागपूर शहर अध्यक्ष ओबीसी महासंघ
सुभाष घाटे , राष्ट्रीय युवा अध्यक्ष यांनी नेतृत्व केले.

महायुतीच्या वतीने जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा

वाशिम – आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी वाशिममध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांसह तब्बल १५ राजकीय पक्षांनी महायुतीची वज्रमुठ बांधली असून आज वाशिम येथील काळे लॉन येथे महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला महायुतीतील सर्व जिल्हाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये ४०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीच्या घटक पक्षांनी केला आहे.