नागपूर : आजच्या बैलगाडी शर्यत बाबतीत सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाने मी आनंदी आहे. कोणी काय केलं यापेक्षा मी काय केलं यावर माझा भर आहे, कष्टकरी वर्गाला, शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. आज सरकार श्रेय घेत असले तरी मी श्रेय घेणार नाही, माझं कर्तव्य आहे, मी शेतकरी कुटुंबातील आहे. खरेतर राजकारणी लोकांनी अधिकारांपेक्षा कर्तव्य शब्दावर जोर दिला तर, देशाच्या प्रगतीसाठी फायदेशीरच ठरेल असे प्रतिपादन माजी मंत्री, काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी आज माध्यमांशी बोलताना केले. उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी महाविकास आघाडीच्या काळात यासंदर्भात वकील नेमले होते.ग्रामीण भागातील शेतकरी आपल्यापेक्षा जास्त आपल्या जनावरांवर प्रेम करतो.-सर्वोच्च न्यायालयाने म्हणणे एकूण घेतल्याचा आनंद आहे. मी सुद्धा राज्याचा पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर बैठका घेतल्या. इतिहासात महाराष्ट्र मंत्रालयात पहिल्यांदा या विषयासाठी ओपन ग्राउंडमध्ये बैठक घेतली होती. पण ती सभाच झाली होती. सुप्रीम कोर्टात जाऊन मी स्वतः वकीलाशी चर्चा केली.दिल्लीला प्रसार माध्यमांनी माझी नोंद घेतली आहे. आज बैलांची मागणी वाढली, बैलांची चांगली जात विकसित होऊ शकते, चांगले बैल जोपासले जाईल हा विषय महत्वाचा आहे, किंमती सोबत त्यांची ब्रीड अपग्रडेशन महत्वाचे आहे यावर केदार यांनी भर दिला.