फ्रान्सचे कौंसिल जनरल जेन मार्क सेरे शेवरले यांची
मनपा आयुक्तांशी नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पावर चर्चा

0

नागपूर : कौंसिल जनरल ऑफ फ्रान्स इन मुंबई जेन मार्क सेरे शेवरले यांनी बुधवारी नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पावर चर्चा केली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी त्यांचे तुळशीचे रोपटे आणि मनपाचा मानाचा दुपट्टा देउन स्वागत केले. याप्रसंगी लिओनेल गोमेरिक, कौंसिल जनरल ऑफ फ्रान्सचे प्रतिनिधी अभय टिकेकर, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, एनएसएससीडीसीएलचे महाव्यवस्थापक राजेश दुफारे, नाग नदी प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार मोहम्मद इसराईल, स्मार्ट सिटीचे डॉ. पराग अरमल आदी उपस्थित होते.
नागपूर शहर हे देशातील ऐतिहासिक शहर असून शहराच्या मध्यभागातून वाहणारी नाग नदी हे शहराचे वैभव आहे. काळाच्या ओघात नदीचे सौंदर्य बाधित झाले. त्यामुळे या नदीच्या पुनरूज्जीवनासाठी मनपाने पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाच्या कोनशिलेचे नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. नदीच्या सौंदर्यीकरण कार्यासाठी एजेन्सी फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी)चे मोठे सहकार्य लागणार आहे. संपूर्ण प्रकल्प दोन टप्प्यात असून प्रदूषण आटोक्यात आणने हे या प्रकल्पाचे प्राधान्य कार्य आहे. यापुढे रिव्हर फ्रन्ट डेव्हलमपेंटचे कार्य केले जाणार आहे.
कौंसिल जनरल ऑफ फ्रान्स इन मुंबई जेन मार्क सेरे शेवरले यांनी नागपूर शहरात पहिल्यांदाच येत असल्याचे सांगत शहराविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. स्मार्ट सिटी प्रकल्प, नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाची माहिती घेतली.