मुंबईः राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर गेल्याने राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील रुग्णसेवा ठप्प झाली असून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Medical Education Minister Girish Mahajan) यांनी संप मागे घेण्याचे आवाहन निवासी डॉक्टरांना केले (Resident Doctors Strike) आहे. निवासी डॉक्टरांना भेडसावणाऱ्या समस्यांची आम्हाला जाणीव असून डॉक्टरांनी आम्हाला १५ दिवसांचा अवधी द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. अतिदक्षता विभाग वगळता सर्व विभागांच्या सेवा बंद ठेवण्याचा इशारा मार्डने दिला होता. रिक्त पदं भरण्यात यावी, २०१८ पासूनची थकीत रक्कम देण्यात यावी तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमधील असोसिएट आणि असिस्टंट प्रोफेसर या जागा भरण्यात याव्यात या निवासी डॉक्टरांच्या मागण्यात आहेत. दरम्यान, संप मागे घेण्याचे व पंधरा दिवसांचा कालावधी देण्याचे आवाहन करताना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, निवासी डॉक्टरांचे अनेक प्रश्न आपण मार्ग लावली आहे. त्यांची थकबाकीची मागणी आम्ही वित्तविभागाकडे दिली आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. आम्ही सकारात्मक आहोत. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी अशा प्रकारे संप पुकारणे योग्य नाही, असे महाजन म्हणाले. आम्ही १४३२ लोकांच्या जागा भरण्यासाठी १५ दिवसांचा अवधी मागितला आहे. उच्चाधिकारा समितीच्या बैठकीचे निर्णयही आम्ही दाखवले. तरीही निवासी डॉक्टर हे ताणत असतील तर ते योग्य नाही, असे महाजन म्हणाले. माझ्याकडे त्यांनी मागण्या मांडल्या असत्या, चर्चा केली असती तर संपाची गरजच पडली नसती, असा दावाही मंत्र्यांनी केलाय
संप मागे घ्या, १५ दिवसांचा कालावधी द्या, वैद्यकीय शिक्षणमंत्र्याचे संपावरील डॉक्टरांना आवाहन
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा