चंद्रपुरातील एनडी बारचा परवाना रद्द करा

0

पालकमंत्र्यांकडे तक्रार : माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांची मागणी

चंद्रपूर. शहरातील (Chandrapur city) रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये वाहन तळाच्या जागेत असलेल्या एनडी रेस्ट्रो बारसंदर्भात (ND RESTO BAR) नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. याच बारसमोर मद्यप्राशन करून झोपलेल्या उमंग दहिवले यांच्या शरीरावरून पाठोपाठ दोन वाहन गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. ५ फेब्रुवारीला ही गंभीर घटना उघडकीस आली. पोलिस तपासातही (police investigation ) ही बाब निष्पन्न झाली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसचे बारसंदर्भात अनेक तक्रारी असल्याने तो बंद करावा, अशी मागणी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख (Pappu Deshmukh ) यांनी केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Guardian Minister Sudhir Mungantiwar ) यांच्याकडे निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे. एनडी बार नियम डावलून रात्री ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येते. अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश दिला जातो, अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत.या बारमध्ये मारहाणीच्या गंभीर घटना घडल्या आहेत. मात्र पोलिस विभागाकडून कारवाई करण्यास नेहमी टाळाटाळ करण्यात येते. या बारला परवाना देताना नियम डावलण्यात आले. त्यामुळे या बारचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी पप्पू देखमुख यांची मागणी आहे.

 

गौरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी
चंद्रपूर शहर व जिल्ह्यात नियम डावलून लोकवस्तीमध्ये मंजुरी देण्यात आलेल्या सर्व दारू दुकानांचे परवाने रद्द करण्यात यावे, दारू दुकान वाटप करताना मोठा गैरव्यवहार झाला असून या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस विभागातील दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीसुद्धा देशमुख यांनी केली आहे.

 

गुन्हेगारी घटनांची पार्श्वभूमी
एनडी बारला मंजूरी देण्याच्या काही दिवसांपूर्वीच रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये गोळीबारची घटना घडली होती. याच परिसरात मनपाचे माजी नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर अज्ञात गुंडांनी हल्ला केला होता. कायदेशीर दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये या बारला नियम डावलून परवानी देण्यात आली. रघुवंशी कॉम्प्लेक्सच्या पूर्वेला हिंदी सिटी व मराठी सिटी हायस्कूल तसेच पश्चिमेला लागून लोकमान्य कन्या विद्यालय आहे. रघुवंशी काँग्रेसमध्ये अनेक शैक्षणिक संस्था व्यापारी संकुल असल्यामुळे दिवसभर महिला व मुलींची वर्दळ असते बार सुरू झाल्याने या ठिकाणी येणाऱ्या महिला व मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. या सर्व बाबीकडे हेतू पुरस्कार डोळेझाक करून पोलिस विभागाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला सकारात्मक अहवाल सादर केला. त्यामुळे शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुधाकर अंभोरे यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप सुद्धा देशमुख यांनी केला आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा