मनपा उद्यान अधिक्षकांविरोधात गुन्हा -मनपा म्हणते शहानिशा न करता चुकीची तक्रार दाखल

0

 

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे उद्यान अधिक्षक व उद्यान पर्यवेक्षक यांच्या विरोधात चार झाडे तोडल्या प्रकरणी धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारीत ही तक्रार दाखल झाली चौकशीअंती गुन्हा दाखल झाला. मात्र,दाखल तक्रार चुकीची, तत्थ्यहिन असल्याचे मनपाने म्हटले आहे.
अजनी चौकातील क्लॉक टॉवर परिसरातील सौंदर्यीकरण कार्यादरम्यान हेरिटेज झाडे कापण्यात आल्याची तक्रार पर्यावरणप्रेमी सचिन खोब्रागडे यांनी धंतोली पोलीस स्टेशनमध्ये केली. या तक्रारीच्या अनुषंगाने मनपाचे उद्यान अधिक्षक अमोल चौरपगार व उद्यान पर्यवेक्षक अनुप बांडेबुचे यांच्यावर धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात उद्यान अधिक्षक अमोल चौरपगार यांनी सांगितले की, सदर परिसरातील कुठलेही हेरिटेज झाड कापलेले नाही. झाडांच्या फांद्या कापल्या असून त्या रितसर परवानगी घेऊनच कापण्यात आलेल्या आहेत. धंतोली पोलीस स्टेशनव्दारे तक्रार दाखल करतांना परिसरातील झाडे हेरिटेज आहेत अथवा नाही याची शाहनिशा करणे गरजेचे होते. मात्र त्यांनी अशी कुठलिही शहानिशा न करता चुकीची तक्रार दाखल केली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा