पीएनबी बँक घोटाळ्याचे बीड कनेक्शन उघड
बीड – देशात गाजलेल्या पीएनबी बँक घोटाळ्याचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील बीड पर्यंत पोहोचले आहेत.याच पार्श्वभूमीवर गुरुवारी सीबीआयने धारूर तालुक्यातील शिवपार्वती साखर कारखान्याची चौकशी केली.
काही दिवसांपूर्वी दाखल झालेल्या पीएनबी घोटाळ्यातील गुन्ह्याचा तपास सीबीआय करीत आहे. याच बँकेकडून शिवपार्वती साखर कारखान्याला 100 कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आले. मात्र,पुरेसे तारण नसतानाही हे कर्ज दिले कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्व प्रकरणानंतर सोळंके यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील जीएस जमादार या व्यक्तीच्या माध्यमातून मुंबईतील डॉक्टर नंदकुमार तासगावकर यांची ओळख झाली. त्यांनी पैसे देण्यास होकार दिला. त्या नंतर शंभर रुपयांच्या बॉण्डवर स्वाक्षरी घेतली आणि यांनीच बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून शंभर कोटींचं कर्ज घेतले त्यातील 98 कोटी रुपये परस्पर उचलले. त्यांच्या विरोधात कारवाई करावी, यासाठी न्यायालयात प्रकरण दाखल आहे. शिवाय पोलीस ठाण्यातही तक्रार दिली असल्याचं सोळंके यांनी सांगितले.