विक्रीसाठी आणलेली फुले शेतकऱ्यांनी फेकली नाल्यात

0

 

जालना – जालन्यात भाजीपाल्याला कमी दर मिळत असतानाच आता फूल उत्पादक शेतकरीही फुलांचे भाव कोसळल्याने हैराण झाला आहे. व्यापाऱ्यांनी फुलांना योग्य भाव न दिल्यानं आज शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुले नाल्यात फेकून दिली.

शहरातील साईबाबा चौकात ही घटना घडली. राब -राब राबून विक्रीसाठी आणलेल्या फुलांना कवडीमोल भाव मिळत असल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी फुलांची विक्री न करता 15 ते 20 क्विंटल मोगरा, गुलाब ही फुलं नाल्यात फेकून देत व्यापाऱ्यांचा निषेध नोंदवला.

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा