Raj Thackeray सुप्रिम कोर्टाचा निकाल संभ्रमात टाकणारा-राज ठाकरे

0

मुंबईः महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आली (MNS Chief Raj Thackeray on SC Verdict) आहे. न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा असल्याचे मत त्यांनी नोंदविले असून कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जपून राहिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिलाय. आधीचे मुख्यमंत्री जपून राहिले नाहीत, म्हणून हे सारे उद्भवले, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. राज ठाकरे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

सर्वच प्रक्रिया चुकल्याचे न्यायालय म्हणत आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता, असेही ते म्हणतात. विधिमंडळातील गट पक्ष म्हणून समजला जाणार नाही. बाहेर पक्ष म्हणून समजला जाईल. आता निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव त्या गटाकडे दिले आहे. त्याचे काय होणार, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोग एक यंत्रणा आहे. सर्वोच्च न्यायालय एक यंत्रणा आहे. आता सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या गोष्टींबाबत निवडणूक आयोग काय करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सगळी धूळ खाली बसल्यानंतर आपल्या सगळ्याला कळेल नक्की काय झाले ते, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.