सोलापूर (SOLAPUR) – उद्धव ठाकरे हे ‘राडोबा’ झालें आहेत,बाळासाहेब ठाकरे हे लढवय्ये होते. रणागनातून तुम्ही पळून गेले. नैतिकता उद्धव (UDDHAV THACKERAY) ठाकरेच्या तोंडून चांगली वाटत नाही. नैतिकता ही २०१९ सालीच त्यांनी सोडली आहे. तुम्ही (MAHARASHTRA) महाराष्ट्राला नेतृत्व देऊ शकले नाही आणि पक्षालाही नेतृत्व देऊ शकले नाहीत असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष (Chandrashekhar Bawankule) चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तेंव्हाच संविधानिक सरकार तयार झाले. उद्धव ठाकरे वारंवार असंविधानिक सरकार म्हणात आहेत, मग त्या विरोधात आम्हाला कोर्टात जावे लागेल. मंत्रीमंडळ विस्तार करणे हा पूर्णतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे. उद्धव ठाकरेना आता रडण्याशिवाय कांही उरलेले नाही. स्वतः शरद पवार यांना असे वाटत आहे की माझा निर्णय चुकला आहे.महाविकास आघाडीचा नेता निवडण्यात चूक झाली. उद्धव ठाकरेंमध्ये विकासाचे व्हिजन नाही.
– संजय राऊत अंघोळीचा साबण काँग्रेसचा वापरतात, तर पावडर राष्ट्रवादीचा वापरात, कपाळावर टिका शरद पवारांचा लावतात आणि शिवसेनेला स्वच्छ धुवून काढतात.काय होतास तू काय झालास तू’ अशी अवस्था संजय राऊत यांची झाली असून नितेश राणे हे आमचे प्रवक्ते खूप छान भाषेत बोलतात.फडणवीस यांचा मेकअप हा विकासाचा आहे. जेवढी काळजी देवेंद्रजींनी उद्धवजींची घेतली तेवढी कोणीही घेतली नाही.देवेंद्र फडणवीस यांनी हजार वेळा तुमच्यावर उपकार केले आहेत.देवेंद्रजीं बद्दल बोलणार असाल तर खपवून घेतलं जाणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकामुळे पुढे गेल्या आहेत.
उद्या निवडणुका झाल्या तरी आम्हाला चालतील.त्यांनी याचिका मागे घ्यावी आम्ही निवडणूकसाठी तयार आहोत
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला लोकसभेला उमेदवार भेटणार नाही. कर्नाटकात भाजप शंभर प्लस जागेसह सत्तेत येईल. शरद पवारांचा राजीनामा म्हणजे घरगुती तमाशा आहे.राजीनामा दिला होता तर नविन रक्ताला संधी द्यायला हवी होती, अजित दादा, सुप्रिया ताईंना संधी होती पण त्यांना राजीनामा द्यायचाच नव्हता.अजित दादा मागच्या 6 महिन्यात आम्हाला कधीही भेटले नाहीत.महाविकास आघाडीमधलेच कांही नेते त्यांचं इमेज डॅमेज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत
दरम्यान, २०२४ ला जेंव्हा देवेंद्रजीं बजेट मांडतील तेंव्हा आश्चर्यकरतरित्या कोलंट उड्या पाहायला मिळतील. येत्या 17 आणि 18 तारखेला राष्ट्रीय अध्यक्ष राज्यात येणार आहेत.उद्धव ठाकरेंना जिथं जायचं आहे तिथं जावं, त्यांना आता कांही कामचं उरलं नाहीये, विधानासभा अध्यक्षाविरोधात पून्हा सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याबाबत ठाकरेंना बावनकुळेनी टोला मारला यावेळी मागच्यापेक्षा ही कमी जागा काँग्रेसला लोकसभेला मिळतील असा दावा केला.