चंद्रपूर : ड्रग्स प्रकरणात बांधकाम विभागाचा अभियंता अडकला जाळ्यात

0

chandrapur: engineer captured in drug case

चंद्रपूर 25 जून : पोस्टाच्या माध्यमातून लिसर्जिक एसिड डायथाइलैमाइन (एलएसडी) ड्रग्स बोलवणाऱ्या व सेवन करणाऱ्या एका बांधकाम अभियंत्याला दिल्ली येथील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो दिल्लीच्या चमुने पोंभूर्ण्यात अटक केली आहे. सदर कारवाईने पोंभूर्ण्यात ड्रग्सचे इंटरनॅशनल तार जोडले गेले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुढील कारवाईसाठी त्याला दिल्ली येथे नेण्यात आले आहे. दरम्यान ड्रग्ज प्रकरणाची सर्व सूत्रे दिल्ली येथे जुळलेली असल्याचे समोर आले आहे.chandrapur: engineer captured in drug case

दिल्ली येथे अमली पदार्थांच्या तस्कराच्या आरोपाखाली एनसीबीने कार्यवाही करून आरोपींना अटक केली होती. या गुन्ह्यात आणखी किती लोकांचा समावेश याचा तपास सुरू होता. या प्रकरणातील काहींना वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली होती. पोंभूर्णा येथील संबंधीताने लिसर्जिक एसिड डायथाइलैमाइन (एलएसडी) २४ व एमडी ३.१८ हे ड्रग्स पार्सलद्वारे बोलवल्याची माहिती एनसीबीला प्राप्त होताच पोंभूर्णा येथील पीडब्लूडी कार्यालयामध्ये सहाय्यक अभियंता हेमंत बिचवे यांना पोंभूर्णा पोलिसांच्या मदतीने एनसीबीच्या चम्मूने पार्सल स्विकारताना ताब्यात घेतले. सदर पार्सलमध्ये सुमारे ७५ हजार किमतीचे हे दोन्ही ड्रग्स हस्तगत केले. संबंधीताच्या रुमवरून काही साहित्य ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. संबंधीताची चौकशी करून त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोंभूर्णा न्यायालयात हजर करून पुढील तपास व कार्यवाहीसाठी दिल्लीला नेण्यात आले. दरम्यान या ड्रग्ज प्रकरणाची सर्व सूत्रे दिल्ली येथे जुळलेली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अभियंता बिचवे हे नागपुरातील रहिवासी आहे.