कोकणात पावसाचे जोरदार आगमन

0

 

रत्नागिरी- समुद्रामध्ये घोंगावणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे थांबलेला पाऊस कोकणात पुन्हा जोमाने सुरू झाला आहे. सकाळपासून पावसाची जोरदार संततधार चालू झाली असून यामुळे शेतकरी सुखावला आहे. पेरणी केलेल्या शेतीला आता पूरक पाऊस पडण्याचे चित्र दिसत आहे.