चंद्रपूरकरांना प्रदूषणाने वेढले
चंद्रपूर. राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये चंद्रपूर शहराचा समावेश (Chandrapur is most polluted city) होतो. शहराच्या अवतीभवती वीज उद्योग प्रकल्प, कोळसा खाणी, पोलाद उद्योग अशे अनेक उद्योग आहेत. त्यामुळे सामान्यापेक्षा प्रदूषणाची पातळी येथे नेहमी वाढलेली असते. हिवाळ्यात वायू प्रदूषण आणखी वाढलेले असते. त्यातही नोव्हेंबर महिना हा या वर्षीचा सर्वात प्रदूषित महिना म्हणून ठरला ( Air Pollution in November month in Chandrapur ) आहे. 30 दिवसांपैकी केवळ एकच दिवस हा प्रदूषणमुक्त ठरला तर 29 दिवस प्रदूषण हे धोकादायक पातळीपर्यंत पोचल्याची आकडेवारी सांगत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहराचा प्रदूषणाचा ( Air Pollution in Chandrapur ) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चंद्रपूरकर प्रदूषणाने वेढले आहेत. प्रदूषणाची वाढलेली पातळी धोक्याची सूचना देणारी ठरली आहे. अशाच चंद्रपूरकरांनी स्वतःच काळजी घेणे गरजेचे ठरले आहे.
राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये चंद्रपूर शहराचा समावेश होतो. शहराच्या परिसरात वीज उद्योग प्रकल्प, कोळसा खाणी, पोलाद उद्योग अशे अनेक उद्योग आहेत. त्यामुळे सामान्यापेक्षा प्रदूषणाची पातळी येथे नेहमी वाढलेली असते. त्यातही हिवाळ्यात हे प्रदूषण आणखी वाढलेले असते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोव्हेंबर महिन्याच्या आकडेवारीत स्पष्ट होते. एकूण 30 दिवसाच्या महिन्यात 29 दिवस प्रदूषण आढळले तर केवळ 1 दिवस प्रदूषण मुक्त होता. गुणवत्ता पाहिल्यास 22 दिवस साधारण प्रदूषित तर 7 दिवस अत्यंत प्रदूषित दिवस आढळले असल्याचे पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
नोव्हेंबरमध्ये 1,7,11,15,22,29,30 या तारखांमध्ये मध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 201 ते 280 असून हे दिवस अति प्रदूषित आढळले .19 नोव्हेंबर हाच एकमेव दिवस शहरासाठी चांगला होता तर उर्वरीत 22 दिवस अतिशय प्रदूषणाचे होते.
अशी असते प्रदूषण पातळी
वायूप्रदूषणाची पातळी ही हवा गुणवत्ता निर्देशांकांत (एक्यूआय) मापकात मोजली जाते. यामध्ये 0-50 चांगला, 51-100 साधारण प्रदूषित, 101-200 प्रदूषित तर 201-300 अति प्रदूषित व 301-400 धोकादायक मानली जाते.
आरोग्यावरील दुष्परिणाम
-0 ते 50 हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा आरोग्यासाठी चांगला असतो.
-51 ते 100 (एक्यूआय) हा आधीच श्वसनाचे रोग्यासाठी त्रासदायक असते.
-101 ते 200 (एक्यूआय) दमा,श्वसनाचे रोग आणि हृदय रोग्यासाठी धोकादायक असते.
-201 ते 300 (एक्यूआय) सर्व नागरिकांसाठी धोकादायक असते.
उपाययोजना आवश्यक
शहराचे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून दोनदा ऍक्शन प्लान तयार करण्यात आला होता मात्र त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे अजूनही शहराचे प्रदूषण कमी झालेली नाही. शहरात अजूनही कचरा मोठ्या प्रमाणात जाळला जातो. वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घरगुती इंधन म्हणून अजूनही कोळशाचा वापर केला जातो, धूर आई धुळीची समस्या मोठी आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी यावर नियंत्रण आणले तर प्रदूषण कमी होऊ शकते असे मत पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले आहे.