घरात शिरून डॉक्टर तरुणीचे अपहरण

0

१०० तरुणांचा धुडगूस ; साखरपुड्याआधी उचलून नेले ; वडिलांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण


रंगारेड्डी. तेलंगणातून (Telangana ) खळबळजनक माहिती पुढे येत आहे. सुमारे १०० तरुणांनी घरात शिरकाव करीत २४ वर्षीय डॉक्टर तरुणीचे अपहरण (Kidnapping of a young Lady doctor ) केले. रंगारेड्डी जिल्ह्यात (Rangareddy District) ही घटना घडली आहे. आरोपींनी मुलीच्या घराबाहेर धुडगूस घालत गाड्यांची तोडफोड केली. ऐवढ्यावरच ते थांबले नाहित तर तरुणीच्या वडिलांनाही बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अपहरण करण्यात आलेली तरुणीचं नाव वैशाली असून, ती डॉक्टर आहे. वैशालीचा साखरपुडा ठरला होता. त्याच्या आधीच शुक्रवारी हा सर्व प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस आरोपींची ओळख पटवत आहेत.


वैशालीच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १०० तरुण घऱात घुसले आणि घरात तोडफोड करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी मुलीचं अपहरण केले. वैशालीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, मुलीवर जबरदस्ती करत तिला घऱाबाहेर ओढत नेले आणि कारमध्ये बसवून घेऊन गेले. पोलिसांनी काहीच केले नाही. माझ्या मुलीचे अपहरण करण्यात आले असून, हे पाप आहे. ते माझ्या मुलीसोबत काय करतील? हा अन्याय असल्याचे त्या म्हणाल्या. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे म्हणले आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी पथके विभागली असून सर्व बाजू तपासत आहोत. हा अत्यंत गंभीर गुन्हा असून आम्ही सर्व परीने प्रयत्न करत आहोत. पीडित कुटुंबाकडून सर्व माहिती घेतली असून सध्या त्यानुसार तपास सुरु असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त सुधीर बाबू यांनी दिली आहे. या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर जनमानसातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तातडीने मुलीचा शोध घेतला जावा, आरोपींना पकडून कठोर शिक्षा केली जावी, अशी मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे.