अभिनेत्री वीणा कपूर यांची मुलाने केली हत्या, संपत्तीचा वाद कारणीभूत

0

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री वीणा कपूर (वय ७४) यांची संपत्तीसाठी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली (Veena Kapoor murder case) आहे. या हत्येत त्यांच्या मुलाचाच सहभाग असल्याचे धक्कादायक वास्तवही या घटनेतून पुढे आले आहे. केली आहे. मुंबईतील जुहू भागात ही घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीणा कपूर यांच्या 43 वर्षीय मुलगा सचिन कपूर याने त्यांची बेसबॉलच्या बॅटने मारहाण करून हत्या केल्याचे आढळून आले आहे. हत्या केल्यानंतर प्रकरण दडपण्यासाठी त्याने मृतदेह एका बॉक्समध्ये भरून माथेरानच्या (Matheran) जंगलात फेकून दिल्याचे लक्षात आले. सचिन कपूर याने संतप्तीच्या वादातून आईची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. संपत्तीवरून वीणा कपूर आणि त्यांच्या मुलामध्ये वाद सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 कोटीं रुपयांच्या फ्लॅटचा ताबा मिळवण्यासाठी मुलाने आईची हत्या केली आहे.


त्यांची सहकारी नीलू कोहली यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर ही धक्कादायक माहिती जाहीर केली आहे. जुहू परिसरातील एका बंगल्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. वीणा कपूर यांचा दुसरा मुलगा अमेरिकेत राहतो. त्याला यासंदर्भात शंका आल्याने त्याने पोलिसांशी संपर्क साधला होता. पोलिसांच्या चौकशीतून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात त्यांच्या घरच्या एका नोकराचाही सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात जुहू पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.

टॉर्टिला डे पटाटा आणि सी फूड सिजलर रेसिपी | Tortilla de Patatas & Seafood Sizzler Recipe | Epi 51

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा