नवी दिल्ली : (new delhi)भारताच्या विरोधात चीनच्या (China on Arunachal Pradesh) कुरापती सुरुच आहेत. भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नावे(china) चीनने बदलली आहेत. पुन्हा एकदा (Arunachal Pradesh)अरुणाचल प्रदेशच्या काही ठिकाणांवर आपला दावा सांगण्यासाठी त्यांची नावे चिनी, तिबेटी आणि पिनयिन लिपीत प्रसिद्ध केली आहेत. चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने रविवारी अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावे जाहीर केली. यामध्ये दोन भूभागांची नावे, दोन निवासी क्षेत्रांची नावे, पाच पर्वतीय प्रदेशांची नावे आणि दोन नद्यांची नावे समाविष्ट आहेत. (china)चीन सरकारच्या प्रांतीय परिषदेने या परिसराला जंगनन असे नाव ठेवून तो तिबेटच्या दक्षिणेकडील भाग असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे स्वत:च ठरविण्याचा प्रकार चीनने पहिल्यांदाच केलेला नाही. यापूर्वीही त्याने असे प्रकार केले आहेत आणि भारत त्याचा तीव्र निषेध करतो, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले.
चीन सरकारने अरुणाचल प्रदेशातील भूभागांना नवीन नावे जारी करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2017मध्ये चीनने अरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांच्या नावे आणि 2021मध्ये 15 ठिकाणांची नावे जाहीर केली होती. भारताने तीव्र आक्षेप घेत नावांच्या या दोन्ही याद्या फेटाळून लावल्या. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अभिन्न आणि अविभाज्य भाग असल्यावर भारताने कायमत भर दिला आहे. तरीही यावर चीनने दावा करणे, यातून त्यांचा वाईट हेतू स्पष्ट होतो. ग्लोबल टाइम्स हे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असून नावांची घोषणा करणे, हे एक कायदेशीर पाऊल असून भौगोलिक नावांचे प्रमाणीकरण करणे हा चीनचा सार्वभौम अधिकार आहे, असा दावा चीनकडून करण्यात आलाय.