सावरकरांचा विषय आला की राजकीय वाद निर्माण होणे, ही आता भारताच्या राजकारणात नवीन गोष्ट राहिलेली नाही. मुळात सावरकरांनी जे लिहून ठेवलं त्याचे संपूर्ण आकलन (interpretation) जो तो आपआपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर करतो आणि आपली भूमिका ठरवतो, पण या सर्व विषयावर चुकीचे आकलन करून जो गोंधळ घातला आहे तो काॅंग्रेसने. तसा हा पक्ष स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारताच्या राजकारणात आहे. तेव्हा पासून ते आज पर्यंत सावरकरांविषयी या पक्षाची भूमिका सतत बदलत गेली आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात १९११ साली सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्यांना अंदमानच्या जेलमधे ठेवण्यात आले. त्यावेळी या शिक्षेच्या विरोधात १९२० साली त्याकाळचे काॅंग्रेस नेते महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि लोकमान्य टिळक व इतर अनेक नेत्यांनी (savarkar)सावरकरांच्या सुटकेची मागणी केली होती. मात्र पुढच्या काळात सावरकरांनी हिंदूत्ववादी विचारधारा मांडली आणि काॅंग्रेसने त्यांच्यापासून दुरावा ठेवला. पुढे ते हिंदूमहासभेचे अध्यक्ष बनले आणि हिंदूमहासभेने नंतर स्वतंत्र हिंदूराष्ट्राची मागणी केली, ही मागणी म्हणजे जिन्नाच्या(“The Two Nation Theory) “द्विराष्ट्र सिध्दांता” ला पाठिंबा देणारी आहे, असा आरोप (congress)काॅंग्रेसच्या काही नेत्यांकडून करण्यात आला. पुढे स्वातंत्र्यानंतर नेहरू हे सावकरांच्या विरोधी विचारसरणीचे नेते होते, तर दुसरीकडे चिंतामण देशमुख, सरदार वल्लभभाई पटेल यांसारखे नेते हिंदूमहासभेसोबत काॅंग्रेसने युती करावी या विचारसरणीचे होते.
पण या गोष्टीला खीळ बसली ती(mahatma gandhi) महात्मा गांधीच्या हत्येने. गांधीहत्येत मुख्य आरोपी (nathuji godse)नथ्थुराम गोडसेंचे संबंध हिंदू महासभा आणि संघाशी असल्याचा ठपका ठेऊन त्याकाळच्या सरकारने या दोन्ही संघटनांवर बंदी घातली होती. सावरकरांवर या हत्येत सहआरोपी म्हणून आरोप होते, पण ते कोर्टात सिध्द झाले नाहीत आणि पुढे यामुळे सावरकर आणि काॅंग्रेस यांच्यात आणखी दुरावा निर्माण झाला.
नंतर नेहरूंच्या पश्चात(Lal Bahadur Shastri) लालबहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान बनले. यांच्या काळात सावरकरांचा थांबलेला भत्ता पुन्हा सुरू केला.
शास्त्रींच्यापश्चात(Indira Gandhi) इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान बनल्या त्यानंतर महिन्याभरातच सावरकरांच निधन झालं. त्यावेळी इंदिरा गांधींनी शोक व्यक्त केला आणि त्यांच्या पश्चात पोस्टाच्या टिकीटाचे अनावरणही करण्यात आले. इंदिरा गांधींनी पुढाकार घेऊन सावरकरांच्या जीवनावर आधारीत एक जीवनपट तयार केला. तसेच ११०००/- रूपये त्यांच्या स्मारकासाठी स्वखर्चातून दिले होते. रणजित सावरकर यांच्या म्हणण्यानुसार तर इंदिरा गांधींनी या सावकरांच्या विचारांना धरून चालणा-या नेत्या होत्या. कारण त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या गोष्टी जसे की पाकिस्तान ला धडा शिकवला, सेना आणि कुटनैतिक संबंध मजबूत केले, परमाणू परीक्षण केले. या सर्व गोष्टी नेहरू-गांधी विचारधारेच्या विरूध्द अशा होत्या. १९८० साली (Swatantraveer Savarkar)“स्वातंत्रवीर सावरकर स्मारक समिती” चे सचिव पंडित बखले यांनी इंदिरा गांधींना सावरकर जन्मशताब्दी निमित्त पत्र पाठवले होते. याला ऊत्तर देताना इंदिरा गांधी सावरकर यांचा उल्लेख हा “वीर सावरकर” असाच केला होता व त्यांच्या “ब्रिटीशांविरूध्द च्या स्वतंत्र लढ्याला वेगळ महत्व आहे, भारताच्या या असामान्यपुत्राची जन्मशताब्दी साजरी करण्याच्या योजनांना मी यशस्वी होण्याची शुभेच्छा देते” असे गौरवोद्गार त्या पत्रात काढले होते.
याबद्दल बोलताना त्यांच्या मंत्रिमंडळात असलेले नेते वसंत साठे म्हणाले होते की, “इंदिरा गांधी या संकुचित विचारसरणीच्या नव्हत्या. सावरकारांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाकडे समग्रतेने पाहिलं पाहिजे, तुम्ही त्यांच्या हिंदूत्वाशी असहमत असू शकता, पण ते एक महान क्रांतिकारी, कवी आणि बुध्दीप्रामाण्यवादी होते, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.” पुढे राजीव गांधीच्या काळात काहीशी हिंदूत्ववादी भूमिका काॅंग्रेस घेत होती. त्यांच्या कार्यकाळात कोणतीही सावरकर विरोधी भूमिका घेतल्याचे पुरावे सापडत नाहीत. त्यामुळे “स्वातंत्र्य संग्रामातील योगदान विसरता येणार नाही” ही इंदिरा गांधीच्या काळात कॅांग्रेसने घेतलेली भूमिका राजीव गांधीच्या नेतृत्वापर्यंत कॅांग्रेस कायम ठेवत आली.
पण या गोष्टीला तडा गेला २००३ मधे सोनिया गांधीच्या नेतृत्वात. २००३ साली वाजपेयी सरकारने संसदेच्या सेंन्ट्रल हॅाल मधे सावरकरांचे तैलचित्र बसवण्याचा प्रस्ताव मांडला, तेव्हा कॅांग्रेसचे ज्येष्ठ नेते (Pranab Mukherjee)प्रणव मुखर्जी आणि शिवराज पाटील सदस्य असलेल्या समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. पण या घटनेनंतर सोनिया गाधींनी सावरकरांचे तैलचित्र संसदेत लावण्याच्या विरोधात एक पत्र त्याकाळचे राष्ट्रपती अब्दूल कलामांना लिहीले. त्यात त्यांनी म्हटले की,”महात्मा गांधी हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या आणि जिन्नाच्या द्विराष्ट्र सिध्दांताचे समर्थक असलेल्या सावरकरांचे तैलचित्र संसदेत लावणे ही एक शोकांतिका असेल”.,
२००४ साली कॅांग्रेस सरकार आल्यावर त्याकाळचे मंत्री मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या(Andaman Nicobar) अंदमान निकोबार भेटीत तिथल्या सेल्युलर जेल मधे असलेले सावरकरांच्या नावाचे फलक काढण्याचे आदेश दिले होते. पण त्याच वेळी महाराष्ट्र काॅंग्रेसचे मोठे नेते कॅाग्रेसच्या “हाय कमांड”ने स्वीकारलेल्या या धोरणाविरुद्ध कुठलीच भूमिका घेत नव्हते. पण काॅंग्रेस हाय कमांड सावरकर विरोधी धोरणांवर कायम होते.
सोनिया गांधी(Sonia Gandhi) नंतर राहुल गांधीच्या नेतृत्वात हीच सावरकर विरोधी भूमिका कायम आहे. २०१६ ला संसदेत भाषण करताना भाजपला उद्देशून राहुल गांधी म्हणाले होते, “आमच्याकडे गांधी आहे तर तुमच्या कडे सावरकर”. त्यामुळे २००३ नंतरच्या सोनिया गांधीच्या नेतृत्वात काॅंग्रेसची सावरकर विरोधी भूमिका आजकाल राहुल गांधींच्या वक्तव्यातून इतकी टोकाची झाल्याचे दिसत आहे की काॅंग्रेस आता वीर सावरकरांचे स्वातंत्रलढ्यातील योगदान देखील नाकारू लागली आहे असे जाणवू लागले आहे. त्यांचे “मैं माफी नहीं मांगूगा, मैं गांधी हु सावरकर नहीं” म्हणजे सावरकारांनी ज्या दया याचिका केल्या त्यावर त्यांनी सावरकरांनी माफी मागितली इंग्रजांचे पाय धरले असे आरोप केले. मुळात राहुल गांधी यांनी दया याचिका म्हणजे काय? ती पारतंत्र्य काळात कोणी कोणी केली? कशासाठी केली? ते करण्यामागे सावरकरांचा उद्देश काय? या सर्व गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. नाहीच काही तर निदान त्यांच्या आजींच्या म्हणजे इंदिरा गांधीच्या काळात वीर सावरकरांचा, त्यांच्या कामाचा गौरव का करण्यात आला, याची माहिती नीट समजून घ्यावी. त्यातून सावरकर थोडे का होईना त्यांना समजतील ही आशा आहे.
अनिरूध्द राम निमखेडकर
9970835724