चिंचवड पोटनिवडणूक : राष्ट्रवादीसह काँग्रेसही इच्छूक

0

महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे

पुणे. राष्ट्रवादी काँग्रसने (NCP) चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक (Chinchwad Assembly By-Election ) लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्या पाठोपाठ काँग्रेसने (Congress) देखील निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. चिंचवड पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi ) उमेदवार दिल्यास आम्ही त्यांचे काम करू. पण, पक्षाने ऐकला चलो चा नारा दिल्यास आमची ऐकला चालण्याची देखील तयारी आहे, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम यांनी व्यक्त केली आहे. आता काँग्रेस देखील पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून यापूर्वीच चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यास तयार असून अंतिम निर्णय राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार हे घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे निकतेच निधन झाले आहे. त्यामुळे चिंचवड पोटनिवडणूक होऊ घातली आहे. भाजपाकडून जगताप यांच्या पत्नी आश्विनि जगताप किंवा बंधू, शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा क्रार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.राष्ट्रवादी देखील ही निवडणूक लढवण्यास आग्रही असून तशी तयारी राष्ट्रवादी ने केली आहे. अंतिम निर्णय शरद पवार हे घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली आहे. आता या पोटनिवडणूकीत काँग्रेस देखील उडी घेतली असून ते तयारी करत आहेत. काँग्रेस ची शनिवारी बैठक पार पडली यात चिंचवड विधानसभा लढवण्यावर ठराव झाला आहे. निवडणूक लढवण्यास कार्यकर्ते आग्रही आहेत. अशी माहिती शहराध्यक्ष कैलास कदम यांनी दिली आहे. राज्यात महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार दिल्यास त्याचे काम करू, पण पक्षाने ऐकला चलो ची भूमिका घेतल्यास तशी आमची तयारी असल्याचे देखील कदम यांनी स्पष्ट केले आहे. उद्या याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्याशी चर्चा करणार आहोत असे देखील त्यांनी सांगितले आहे.