किंमत ऐकून बसेल धक्का
मेरठ. संक्रांत (Makar Sankranti ) आटोपली असली तरी देशभरात सध्या पतंगबाजीचा माहोल सुरू आहे. हौसेला मौल नाही म्हणत मोठमोठ्या रंगीबेरंगी, विविध आकाराच्या पतंग आकाशात उडविल्या जात आहेत. पण, कल्पना केली आणि कुणी विचारलेच की, सोन्याची पतंगही (Gold Kite) उडू शकतो का, सोन्याचा धागाही असू शकतो का?, तर त्याचे उत्तर नकारात्मकच आसेल. पण, हे खरेच आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये (Meerut, Uttar Pradesh ) अशी हटके पतंग तयार करण्यात आली आहे. या पतंगची किंमत 21 लाखांच्या घरात आहे. मेरठमध्ये झालेल्या इन्व्हेस्टर्स समिटमध्ये ही पसंत ठेवण्यात आली. येथे आलेल्या मंत्र्यांनाही सोन्याची पतंग उडवण्याचा मोह आवरता आला नाही. यूपी सरकारमधील एमएसएमई मंत्री आर के सचान यांनी सोन्याची पतंग असलेला स्टॉल पाहिला तेव्हा त्यांनीही सोन्याची पतंग उडविण्याची हौस भागवून घेतली.
सोन्याची पतंग उडवल्यानंतर मंत्र्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. जेव्हा मंत्र्यांनी या सोन्याच्या पतंगासोबत सेल्फी काढला तेव्हा मेरठचे जिल्हाधिकारी दीपक मीणा यांनाही सोनेरी पतंगासोबत सेल्फी घेण्यापासून राहवले नाही. मंत्री आणि डीएम यांनी या इनोवेशनचे कौतूक केले. मंत्री आर. के. सचान म्हणाले की, त्यांनी अनेक पतंग पाहिले आहेत, पण सोन्याची पतंग पहिल्यांदाच पाहिली.
प्रजासत्ताक दिली आकाशात घेणार भरार
यंदा प्रजासत्ताक दिन आणि वसंत पंचमी एकाच दिवशी आहे. हेच औचित्यसाधून त्या दिवशी सोन्याची पतंग मेरठच्या थापरनगरमध्ये उडवली जाणार आहेत. एकवीस लाख किमतीची ही पतंग पाहण्यासाठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.
7 कारागिरांनी 16 दिवसात घडवली पतंग
पतंग तयार करणारे सराफा व्यापारी अंकुर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनासाठी ही खास पतंग तयार करण्यात आली आहे. सात कारागिरांनी 16 दिवसांत ही सोन्याची पतंग तयार केली आहे. त्याची खासियत म्हणजे त्यावर सोन्याचा थर आहे. त्याचा धागा देखील सोन्याचा बनलेला आहे. सध्या या सोन्याच्या पतंगाची सर्वत्र चर्चा रंगली आहे