वाहनाच्या धडकेत चितळ जखमी

0

काटोल नाक्याजवळ घटना ः उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात सोडले
नागपूर. वाहनाचा धडकेने जखमी झालेले चितळ (Chital was injured in a collision with a vehicle ) सैरावैरा पळत होते. ही बाब वनरक्षकाच्या लक्षात येताच गोरेवाडा प्रकल्पातील (Gorewada project ) कर्मचाऱ्यांनी महत प्रयत्नांती चितळाला शोधून काढले. त्याच्यावर उपचार केल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात (After treatment, they were released into their natural habitat ) आले. मुक्तता करताच चितळाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. शनिवारी दुपारी काटोल नाका परिसरात हा घटनाक्रम घडला. वनरक्षक रंगारी हे शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास काटोल मार्गावरून जात असताना जखमी चितळ दिसले. संभाव्य धोके लक्षात घेऊन त्यांनी गोरेवाडा प्रकल्पातील वनरक्षक प्रतिक घाटे यांना सूचना दिली. घाटे यांनी सहकारऱ्यांसह चितळाला शोधून काढले. पण, रस्त्यावर वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणावर असल्याने चितळ सैरभैर झाले. एका जागी न थांबता झुडपाच्या आडोसाने सैरावैरा पळत होते. घाटे यांनी गोरेवाडा प्रकल्पातील वन्यजीव संशोधक व प्रशिक्षण केंद्राला माहिती देऊन मदत मागवून घेतली. केंद्रातील पशुवैद्यक डॉ. सुजित कोलगंथ चमूसह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. डॉ. कोलगंथ यांनी इंग्जेक्शन मारून चितळाला बेशुद्ध केले. तपासणी केली असता दुखापत पारशी गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले. शुद्धीवर येताच चितळाला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक शतानिक भागवत यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली.

गोरेवाडा प्रकल्प ते काटोल नाक्या दरम्यान तब्बल 4 किमी परिसरात अडीच तास पायी शोधमोहीम राबविण्यात आली. त्यानंतरच चितळ दृष्टीपथास पडले. यादर्मयान अनेक कर्मचाऱ्यांच्या पायात काटे रुतले, काहींना खरचटले. यानंतरही जिद्दीने चितळाला शोधून काढण्यात आले. वेळीच वनक्षेत्रात सोडले नसते तर सैरावैरा पळणारे चितळ वाहनाखाली येण्याची शक्यता होती. रात्री शहराकडे गेले असते तर भटक्या कुत्र्यांकडूनही धोका होता.

माहुरझरी परिसरात मोराची शिकार
जिभेचे चोचले पुरविण्यासाठी चक्क राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करणाऱ्या दोघांच्या वन विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. नागपूर शहरालगत माहुरझरी येथून दोघांनाही पकडण्यात आले. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत वन कोठडी सुनावली आहे. कळमेश्वर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या माहुरझरी येथील काही व्यक्ती मोराची शिकार करीत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्या आधारे वनविभागाच्या पथकाने सापळा रचून मोराची शिकार करणाऱ्या दोघा जणांना ताब्यात घेतले. तपासात रणजित पवार याने मोरांची शिकार केल्याचे समोर आले. त्याने घरी मोराचे मास शिजवण्यासाठी ठेवले होते तर उर्वरित मास विक्रीसाठी ठेवले होते. शिकाऱ्याकडून जाळे व गुंगीचे औषध ताब्यात घेण्यात आले आहे. रणजीत राजकुमार पवार याच्यासह अजून एकाला ताब्यात घेतले आहे

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा