मुंबई. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) 30 एप्रिलला गट ब आणि गट क पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे हॉल तिकीट (Hall Ticket) उपलब्ध असलेली टेलिग्रामची लिंक सोशल मीडियामध्ये (Social Media) व्हायरल होत आहे. या लिंकमध्ये 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट असल्याचे सांगतिले जात आहे. हा संपूर्ण प्रकार डेटा सेक्युरिटीशी संबंधित असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकाराची दखल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आली आहे. ही लिंक कशाप्रकारे जनरेट झाली? कोणी जनरेट केली? या संदर्भात एमपीएससी माहिती घेत आहे. शिवाय या लिंक संदर्भात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एमपीएससीकडून कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन दिवसांपूर्वीच हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. मात्र, हॉल तिकीट दिल्यानंतर ही लिंक समोर आली आहे. त्यावर हा फक्त नमुना डेटा आहे, आमच्याकडे सर्व एमपीएससी विद्यार्थ्यांची माहिती देखील आहे. ऑनलाईन पोर्टल लॉगिन, फी फावती, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी आणि बरेच काही. पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका 2023 देखील उपलब्ध आहे, असा दावा व्हायरल लिंकमध्ये करण्यात आला आहे.
एमपीएससीने माहिती लिक झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. नियोजित परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे 21 एप्रिल रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या वेबसाईटवर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब आज निदर्शनास आली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. या चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लीक झालेला नाही. याची तज्ज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसंच या चॅनलवर उमेदवारांचा (Personal data)वैयक्तिक डेटा उपलब्ध असल्याचा तसेच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून अशाप्रकारे कोणताही (data)डेटा अथवा प्रश्नपत्रिका लीक झालेली नसल्याचे एमपीएससीने म्हटले आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करुन घेतलेल्या प्रवेशप्रमाणत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येईल, असेसुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे.
अंडा रेशमी पराठा आणि डेलगोना कॉफी | Egg Reshmi Paratha Recipe | Dalgona Coffee Recipe | Ep- 114 |
https://youtu.be/6I8hP8EYVQY?list=PLfo99UFoWEZLVJ7cGqjYq4v_wsukEAIo_