चंद्रपूर.- (Chandrapur) सततच्या अवकाळी पावसाने संपूर्ण विदर्भालाच तडाखा दिला आहे. सर्वत्र शेत पिकांचे प्रडंच नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी शनिवारही रात्र कहर बरसविणारी ठरली. जिल्हात विजेचे तांडव पाहायला मिळाले. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. नवलाजी लडके, पुंढलीक चेडे अशी मृतकांची नावे आहेत. शहरालगतच्या दाताळा आणि ब्रह्मपुरी तालुक्यतील (Brahmapuri Taluk)धानोली पोहाचक येथे या घटना घडल्या. २ बैलदेखील दगावले आहेत. मूल तालुक्यात वादळी पावसामुळे (Stormy rain)चार घरांची पडझड झाली आहे. झाडांचीही मोठी पडझड झाली आहे. झाडाच्या फांद्या विजतारांवर पडल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा देखील बंद झाला होता. त्यातच हवामान विभागाने पुढील काही दिवस ही मालिका कायम राहणार असल्याची शक्यता वर्तविली असल्याने चिंतेत भर पडली आहे.
शनिवारच्या रात्री मेघगर्जनेसह (Unseasonal rain)अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडापून काढले. चंद्रपुर शहरालगत असलेल्या दाताळा गावातील शेतशिवारात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पुंडलीक चेडे वय (६१) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ते दाताळा गावातील रहिवासी आहेत. शेतात काम करीत असताना अचानक पाऊस सुरू झाला. यामुळे घराकडे परतत होते. वाटेत असताना वीज पडून त्यांचा मृत्य झाला. मृत्यूची वार्ता कळताच गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे.
दुसरी घटना ब्रह्मपुरी तालूक्यात घडली. तालुक्यातील धानोली पोहाचक येथील नवलाजी बळीजी लडके ( ४०) हे म्हशी राखायला गेले होते. त्याच दरम्यान वीज कोसळली. यात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. सावली, राजुरा तालुक्यात विज कोसळल्याने दोन बैल दगाविले आहेत.
मूल तालुक्यात (Unseasonal rain)वादळी पावसामुळे चार घरांची पडझड झाली. चंद्रपूर शहरात शनिवारी सकाळी मोबाईल टॉवर कोसळले आहेत. शहराच्या विविध भागात २५ झाडे कोसळली आहेत. काही झाडे वीज खांबावर कोसळल्याने (Electricity)वीजेच्या तारा तुटल्या होत्या. तीन ते चार तास वीज पुरवठा खंडित झाला होता. जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक तालुक्यातील पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री (Sudhir Mungantiwar)सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.