मद्यधुंद युवकाचा थेट पोलिस ठाण्यात गोंधळ

0

खामगाव. मद्यधुंद युवक थेट पोलिस ठाण्यात पोहोचला (Drunken youth reached the police station) आणि गोंधळ घालणे सुरू केले. शुक्रवारी रात्री ९ वाजता दरम्यान खामगाव येथील शहर पोलिस स्टेशनमध्ये (Khamgaon Police Station) हा प्रकार घडला. अश्लिल शिवीगाळ करीत पोलिस निरिक्षकांच्या केबीनच्या बाजूला असलेल्या महिला पोलिस कक्षाच्या दरवाजाला लाथा मारत आरडाओरड करून धुमाकुळ घातला. मद्याची धुंद असल्याने तो कुणाचेही काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. अश्लिल भाषेत शिविगाळ करीत असल्याने पोलिसांनी त्याला बाजीरावचा हिसका दाखविला. पोलिस भरती अपयशी ठरल्याने त्याने हे कृत्य केल्याचे (due to failure of police recruitment ) समोर आले आहे. त्याची मनोदशा लक्षात घेत समजुत काढत त्याला पालकांच्या स्वाधिन करण्यात आले. त्यानंतर नातेवाईक त्याला पोलिस स्टेशनमधून घेऊन गेले. पोलिस ठाण्यातील हा गोंधळ बघुन अनेकांना धक्का बसला.


गोंधळ घालणाला युवक शेगाव तालुक्यातील असल्याचे समजते. त्याने पोलिस भरतीसाठी पात्रता परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्याला अपयश आले. त्यामुळे हिरमोड झालेल्या युवकाने खामगाव शहर गाठले. काही सहकाऱ्यांनी त्याला दारू पाजली. प्रचंड दारू ढोसल्यानंतर नियंत्रण हरविलेल्या अवस्थेत युवकाने सुरूवातीला पोलिस वसाहतीत शिरकाव केला. त्यानंतर वसाहतीच्या गेट मधून शहर पोलिस स्टेशन गाठले. आवारातील पार्किंग आणि मूत्रीघराजवळ बसून बराचवेळ गोंधळ घातला. युवकाकडील बॅगमधील कागदपत्रांच्या आधारे उपस्थित पोलिसांनी त्याची ओळख पटविली. त्याच्या नातेवाईकांसह माहिती देण्यात आली. गावातील काही युवक पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. त्याला समजावू लागले. पण, कुणालाही न जुमानता त्याने शहर पोलिस निरिक्षकांच्या केबिनकडे धाव घेतली. महिला पोलिस कक्षाच्या दरवाजाला लाता मारत पोलिसांना अश्लिल शिविगाळ सुरू केली. त्यावेळी उपस्थित पोलिसांनी त्याच्यावर नियंत्रण मिळवित पोलिसी खाक्या दाखविल्या. बाजीरावचा प्रसाद दिल्यानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन केले. दरम्यान, शनिवारी सकाळी या युवकाविरोधात शहर पोलिसांनी कलम ११०, ११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली.
मद्यधुंद अवस्थेत धुमाकुळ घालणाऱ्या युवकाला डीबी प्रमुखांनी संयमी भूमिका घेत समजाविण्याचा प्रयत्न केला. पोलिस भरतीत हिरमोड झाल्यानंतर संतुलन गमविलेल्या या युवकाला डीबी प्रमुखांसह उपस्थितांनी पोलिस स्टेशनच्या आवाराबाहेर जाण्याच्या सर्वसंधी दिल्या. काहींनी त्याच्या गाव, परिसरातील राजकीय नेत्यांशीही संपर्क साधला. मात्र, तो काही केल्या बधत नव्हता. गावातील युवक आणि उपस्थित पोलिस समजावित असतानाच चेकाळलेला युवक आणखी सैराट होत होता. पोलिसांना शिविगाळ करीत होता. अशातच त्याने शहर पोलिस निरिक्षकांच्या महिला कक्षाला लाता मारत अश्लिल शिविगाळ केली. त्यावेळी निरिक्षकांच्या बाजूच्या केबीनमधील काही पोलीसांच्या अंगात ‘वाघ’संचारला. एकाने आपली नखे रूतविली. तर काहींनी बंद खोलीत बाजीरावचा हिसका दाखविला. त्याच्या अंगावर पाणी ओतले. तेव्हा कुठे ‘दत्ता’शुध्दीवर आला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा