पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कर्नाटकात हल्लाबोल
मांडा (कर्नाटक). पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) आज कर्नाटक दौऱ्यावर (Karnataka tour ) आहेत. त्यांनी मांडा येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षावर हल्लाबोल (Attack on Congress and its allies) करीत बोचरे बाण डागले. ते म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष मोदीची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण मोदी बंगळुरू-म्हैसूरएक्स्प्रेस वे बांधण्यात व्यस्त आहे. काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात आणि मोदी गरिबांचे जीवन सुखकर करण्यात व्यस्त आहेत. देशाच्या करोडो माता – भगिनींचे आशीर्वाद मोदींचे सर्वात मोठी सुरक्षा कवच आहे, हे मोदींची कबर खोदण्याची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसवाल्यांना माहीत नाही, अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. कर्नाटकमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यापूर्वी पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या वर्षातील त्यांचा कर्नाटक राज्यातील हा सहावा दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान ते अनेक प्रकल्पांचे लोकार्पणसुद्धा करणार आहेत.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणले की, 2014 पूर्वी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, त्या काळात त्यांनी गरीबाला उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. गरिबांच्या विकासासाठी असलेला हजारो कोटींचा पैसा काँग्रेस सरकारने लुटला. काँग्रेसने गरिबांच्या दुःखाचा कधीच विचार नाही केला. उलट, शेतकऱ्यांच्या छोट्या- छोट्या अडचणी दूर करुन भाजप त्यांचे प्रश्न सोडवत आहे. मांड्यातील 2.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे पाठवण्यात आले आहेत,’ असेही मोदी यावेळी म्हणाले.
आपल्या सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करताना पीएम मोदी म्हणाले, ‘गेल्या 9 वर्षात भाजप सरकारच्या योजनांमुळे करोडो गरिबांचे जीवन सोपे झाले आहे. काँग्रेसच्या राजवटीत गरिबांना सुविधांसाठी सरकारच्या चकरा माराव्या लागत होत्या. आपल्या देशात अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्पही वेगाने पूर्ण जात आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने अप्पर भद्रा प्रकल्पासाठी 5,300 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. यामुळे कर्नाटकातील मोठ्या भागातील सिंचनाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत. आम्ही ठरवले आहे की, उसापासून बनवलेल्या इथेनॉलचे उत्पादन वाढवायचे आहे. म्हणजेच जास्त उत्पादन झाल्यास उसापासून इथेनॉल बनवले जाईल. इथेनॉलपासून शेतकऱ्याची चांगली कमाई होईल.