कमलजीत कौर यांना महिला दिन ‘प्रतिभा सन्मान पुरस्कार’

0

नागपूर : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रख्यात कर्करोग समुपदेशक डॉ. कमलजीत कौर यांना ‘प्रतिभा सन्मान पुरस्कार’ देत सन्मानित करण्यात आले. कर्करोगाच्या बाबतीत काळजीतील सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा सामाजिक कार्यकर्त्या म्हणून हा ‘प्रतिभा सन्मान पुरस्कार’ देऊन त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी गौरविण्यात आले. प्रदीप मारोतकर यांच्या सौंदर्य आणि आरोग्य सेवा संस्थेने हा प्रतिभावान महिलांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. डॉ कौर, एक प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि कर्करोग सल्लागार असून सध्या HCG NCHRI कॅन्सर केअर सेंटरमध्ये त्या काम करीत आहेत. संपूर्ण नागपुरातून या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झालेल्या त्या एकमेव कर्करोग समुपदेशक होत्या. कौर यांनी पुरस्काराबद्दल आयोजकांचे आभार मानले आणि कर्करोगाविरुद्धचे युद्ध यापुढेही सुरू ठेवण्याची शपथ घेतली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा