
आमदार वैभव नाईक यांचे भाकित : राजकीय वर्तुळात चर्चा
मुंबई. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane ) यांचे मंत्रीपद अवघ्या 2 महिन्यांत जाणार असल्याचे भाकित ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik ) यांनी वर्तविले आहे. वैभव नाईक यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली असून कोकणातील राजकीय वर्तुळात नव्याने नारायण राणे यांचे मंत्रिपद जाण्यासंदर्भातील चर्चा सुरू झाल्या आहेत. कोकणात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांमध्ये चांगलीच जुंपल्याचे (Controversy between the Thackeray group and the Rane family ) दिसून येत आहे. दोन्हीकडून एकमेकांवर कडाडून टीका केली जात आहे. कधी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत तर कधी वैभव नाईक विरुद्ध नितेश राणे यांच्यातील शाब्दिक चकमक होताना दिसते. या प्रकारामुळे कोकणातील राजकारण वारंवार तापलेले दिसून येत आहे.
होळी आटोपली असली तरी कोकणात राजकीय शिमका सुरूच आहे. विरोधकांच्या नावाने आरोळ्या ठोकल्या जात आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लक्ष केले आहे. ते म्हणाले की, आतापर्यंत इतरांचे राजकीय अस्तित्व ठरविणाऱ्या नारायण राणे याचेच राजकीय अस्तित्व आता भाजप ठरवणार आहे. भाजपला राणेंची राजकीय दृष्टया गरज नाही. त्यामुळे राणेंना राजीनामा द्यावा लागणार असल्याचे वैभव नाईक यांनी म्हंटले आहे. नाईकांच्या वक्तव्यनंतर नारायण राणे यांचे मंत्रिपद जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नाईक यांनी राणेंचे मंत्रिपद का जाणार याचे कारणही यावेळी त्यांनी सांगितले आहे. वैभव नाईक यांच्या या विधानावर भाजपकडून किंवा नितेश राणे, निलेश राणे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रीया आली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केंद्राती मंत्रीपद जाणार की कायम राहणार, हे काळच सांगू शकणार आहे. मात्र, कोणतेही कारण नसताना राणेंसंदर्भातील चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यातच राणे कुटुंबीयांकडून प्रतिक्रिया आल्यास कोकणातील तापमाण आणखीच तापणार ऐवढे मात्र नक्की.