अकोला : गांधीग्राम येथील पुलाला तडा गेल्याच्या कारणावरून हा पूल रहदारीसाठी बंद (Gandhigram bridge closed for traffic ) करण्यात आला आहे. परिणामी गांधीग्राम-अकोट मार्गही (Gandhigram-Akot) गेल्या सहा महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंदच आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सहा महिन्याचा कालावधी उलटूनही उपाययोजना न केल्याने स्थानिक नागरिकांनी रविवारी 12 मार्चला रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला (Citizens expressed their anger). वंचित युवा आघाडीच्या बॅनरखाली हे आंदोलन करण्यात आले. क्षेय लाटण्यासाठी पूलाचे काम खोळंबून ठेवले गेले असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींवर संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलकर्त्यांनी बंद असलेल्या मार्गाचे काम पूर्ण करून अकोला- गांधीग्राम- अकोट मार्ग लवकर सामान्यांसाठी खुला करण्याची मागणी केली आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वातील आंदोलनात युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर यांच्यासह दादाराव पवार, ॲड. प्रशिक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गवई, नितीन वानखडे, आनंद खंडारे, आशिष रायबोले, श्रीकृष्ण देवकुणबी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुजित तेलगोटे, जय तायडे, संघटक रितेश यादव, वैभव खडसे, नागेश उमाळे, दादू लांडगे, मंगेश सवंग, विजय भटकर, दीपक ठाकूर, विकास सावळे, आकाश गवई, आकाश जंजाळ, निशांत राठोड, नंदकिशोर मापारी, अनंता इंगळे, रामदास वानखडे, अनिल वानखडे, निखिल तायडे, दीपक दरोकर, निशांत दारोकर, अमर वानखडे, रंजीत तायडे आदी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींना शोधा 51 रुपये मिळवा
प्रारंभी अकोला वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा कार्यकारणीच्यावतीने पूर्णा नदीच्या जलाने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यात आला. तसेच हरवलेल्या लोकप्रतिनीधींना शोधून देण्याचे साकडे देवाला घातले. लोकप्रतिनिधींना शोधून आणणाऱ्यास 51 रुपयांचे बक्षिस दिले जाणार असल्याची घोषणाही याप्रसंगी करण्यात आली. अकोला-गांधीग्राम-अकोट मार्ग गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. सहा महिने उलटून देखील यासंदर्भात उपाययोजना झाली नसून, याउलट तत्पुरत्या स्वरुपाचा पूल बनवून वाहतूक सुरू करण्याचा देखावा, तसेच त्याचे श्रेय घेण्यासाठी उद्घाटन करण्यात येत असल्याचा आरोप याप्रसंगी करण्यात आला. खासदार संजय धोत्रे, अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर आदी लोकप्रतिनीधी हरविल्याच्या घोषणाही याप्रसंगी करण्यात आली.