मविआची संभाजीनगरची सभा न होऊ देण्याचे कारस्थान-संजय राऊत

0

मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन एप्रिलला महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा होऊ नये यासाठी दंगलीचे व कायदा सुव्यवस्थेचे कारस्थान केले जात असल्याचा आरोप(Thackeray Group) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आणि सभेला परवानगी नाकारायची यासाठी हे सगळे सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुरु असताना मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री(devendra fadanvis) देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? असा सवाल करून काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकरली असल्याचा आरोपही त्यांनी केला. राम नवमीच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
संजय राऊत म्हणाले की, अनेक ठिकाणी दोन्ही धर्माच्या लोकांनी सामंज्यसाची भूमिका घेतली.(sambhaji nagar) छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन एप्रिलला महाविकास आघाडीची सभा आहे. ती सभा होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थेच्या कारणाखाली सभेला परवानगी मिळू नये, यासाठी हे कारस्थान आहे. यापूर्वी रामनवमी दिवशी कधी हल्ले झाले नव्हते. सध्या शिवसेनेच्या खेड, मालेगावमधील सभेला जो प्रतिसाद मिळत आहे ते पाहिल्यावर काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकरली आहे. त्यांनतर काही लोकांना हाताशी धरुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राऊत म्हणाले. कारण नसताना जातीय तेढ निर्माण केली जात असल्याचे राऊत म्हणाले. राज्यात गृहमंत्र्यांचे अस्तित्वच दिसत नाही, असे ते म्हणाले. दोन एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या सभेला लाखो लोक हजेरी लावणार आहेत. त्या ठिकाणी झालेली दंगल ही सरकारप्रणित असल्याचा आरोपही त्यांनी केला.