
बल्लारपूर : बल्लारपूर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बामणी (BIT-ITI) येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. जानवी मेश्राम (वीजतंत्री – द्वितीय वर्ष) यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता गटनिदेशक अविनाश बा. पाटील यांच्या हस्ते झाली.
संविधान दिनाच्या औचित्याने संस्थेतर्फे प्रशिक्षणार्थ्यांसाठी “१९४७ अगोदरचा भारत” या विषयावर पोस्टर मेकिंग स्पर्धा २१ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. राजपालजी कांबळे (बाबुपेठ) यांना आमंत्रित करण्यात आले होते.
स्पर्धेत प्रथम पारितोषिक – आशिष शाह (वीजतंत्री – प्रथम वर्ष),
द्वितीय पारितोषिक – आशिक रामटेके (वीजतंत्री – द्वितीय वर्ष),
तृतीय पारितोषिक – मोहनसिंग राठोड (जोडारी – द्वितीय वर्ष)
यांनी पटकावले.
कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संस्थेचे प्राचार्य श्री. जाहिद एच. अन्सारी यांनी सर्व विजेते, सहभागी प्रशिक्षणार्थी तसेच निदेशक वर्ग यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.















