संघ मुख्यालयाजवळ संशयास्पद हालचाली?

0

 नागपूर

संघ मुख्यालयाची मोबाईलद्वारे छायाचित्रे घेतल्याची बाब उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. काही जणांकडून मोबाईलद्वारे इमारतीची छायाचित्रे घेतली जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्यामुळे मुख्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरातील महालमध्ये असून, हा परिसर शहर पोलिसांच्या कोतवाली ठाण्यांतर्गत येतो. मुख्यालयाला असलेला घातपाताच्या कारवाईचा धोका लक्षात घेऊन इमारत परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावलेला आहे. तसेच कोतवाली पोलिसांचीही येथील प्रत्येक घडामोडीवर नजर असते.
मागील काही दिवसात संघ मुख्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावर काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असल्याचे व ते मोबाईलद्वारे इमारतीचे छायाचित्रे घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसून आल्याची चर्चा आहे. ही बाब गंभीर असून संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ज्या गांभीर्याने हाताळायला हवा त्या पद्धतीने तो हाताळला जात नसल्याचे बोलले जात आहे.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा