कोरोना, एच 3 एन 2 ने वाढविली चिंता

0

अमरावतीत कोरोनाच्या 14 रुग्णांची भर : आरोग्य यंत्रणा अलर्टवर

अमरावती. सर्वसामान्यांना धडकी भरविणाऱ्या संसर्गजन्य आजारांनी अमरावतीकरांची चिंता पुन्हा वाढविली आहे (Communicable diseases have again raised the concern of Amaravatikar). जिल्ह्यात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत आहे (Corona is raising its head once again). दोन दिवसांमध्ये कोरोनाचे एकूण 14 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 41 वर पोहोचली असून पन्नाशीकडे वाटचाल सुरू आहे. त्यातच एच 3 एन 2 एन्फ्लूएंझाचे देखील 2 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून (2 new positive patients of H3N2 influenza were also found ) आल्याने एकूण रुग्ण संख्या 5 झाली आहे. दोन्ही संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण काळजी नक्की घ्यावी, यापूर्वी करोना संकटाच्या काळात घेतली तीच खबरदारी पुन्हा घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे. ताप आल्यास तो अंगावर काढू नका तातडीने डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याची सूचनाही केली जात आहे.

राज्यभरातच वातावरणात बदल झाला आहे. सर्वत्र गारपीट आणि अवकाळी फटका बसतो आहे. यामुळे तापमान बरेच खाली आले आहे. वातावरणातील याच बदलामुळे आजार बळावत आहेत. सर्वत्रच व्हायरल इन्फेक्शन वाढल्याने सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. घरोघरी सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत.

अमरावती जिल्ह्यात एच 3 एन 2 आजाराचाही शिरकाव झाला असून रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. जिल्ह्यात दोन वर्षे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या फेज – २ इमारतीचा वापर करण्यात आला. परंतु, मागील वर्षभरात कोविड रुग्णांची संख्या ही कमी होऊन शून्यावर पोहोचल्यानंतर मात्र आरोग्य प्रशासनाने येथील कोविड वॉर्ड बंद केला. परंतु, आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात 14 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 18 मार्चला 8 तर 19 मार्चला 42 पैकी 6 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. कोरोना व एच 3 एन 2 रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता, जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) वॉर्ड क्र. 10 मध्ये बारा खाटांचे आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा