गडचिरोलीकरांनो काळजी घ्या, शहरात शिरले वाघ

0

आयटीआय चौकात दिसले 2 वाघ : बघणाऱ्यांची बसली पाचावर धारण

गडचिरोली. वनसंपदेने नटलेला जिल्हा म्हणून गडचिरोलीचा (Gadchiroli) गौरवाने उल्लेख केला जातो. शहरालाही जंगलाने वेढले असल्याने इथले वातावरण कायमच सुखावणारे ठरते. विपूल प्रमाणात असणाऱ्या वनसंपदेमुळे जिल्ह्यात वाघांची संख्या प्रचंड वाढली आहे. आतापर्यंत शहराच्या वेशीवरही वाघ दिसत होते. आता मात्र जंगलाच्या राजाने वेशही ओलांडली आहे. आगदी शहराच्या आत दोन वाघ (Two tigers were seen inside the city ) रुबाबात फिरत असल्याचे दिसले. हे चित्र बघणाऱ्या सर्वांचीच पाचावर धारण बसली. भीती आणि दहशतीमुळे वाघ बघेल तो धावत सुटल्याचेही दिसून आले. ही घटना गडचिरोलीतील आयटीआय चौकातील कृषी महाविद्यालयाच्या नर्सरीमधील (In the Nursery of Agriculture College at ITI Chowk ) आहे. सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अनेकांनी इथे वाघाला बघितले. तातडीने वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. लागलीच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी नर्सरी परिसरात दाखल झाले असून वाघावर पाळत ठेऊन आहेत.
आतापर्यंत गडचिरोली शहरालगत अनेकदा वाघ दिसले आहेत. काही महिन्यांपूर्वी शहरापासून अवघ्या तीन ते साडेतीन किमी अंतरावर असलेल्या चांदाळा बिटमधील कक्ष क्रमांक १७४ मध्ये जंगलात लाकडे तोडणाऱ्या महिलेला वाघाने ठार केले होते. त्यावेळीच मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तविली गेली होती. वाघ शहरालगत पोहोचत असले तरी ते शहरात शिरत नसल्याने नागरिक बिनधास्तपणे वावरत होते. शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर मात्र काहीशी खबरदारी घेतली जात होती. आता मात्र वाघांनीच हद्द ओलांडली आहे. शहरातील कृषी महाविद्यालय परिसरात असेलल्या नर्सरीमध्ये वाघ दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. यासंदर्भात माहिती मिळताच वनविभागाचे पथक नर्सरी परिसरात दाखल झाले. त्या वाघावर वन कर्मचारी नजर ठेऊन आहेत. सुरेक्षेच्या दृष्टिकोनातून दोनही मार्ग बंद करण्यात आले आहे. कृषी महाविद्यालयाच्या मागील बाजूस जंगल असल्याने त्या मार्गे हे वाघ शहरात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या वाघांना जेरबंद करण्यासाठी चंद्रपूरहून विशेष पथक गडचिरोलीसाठी रवाना झाले असून लवकरच ते नर्सरीस्थळी पोचतील असे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा