बाप रे! अल्पवयीन मुला-मुलीने प्यायले फिनाईल कारण वाचून बसेल धक्का

0

बुलडाणा. गेल्या महिन्यातच अवघ्या जगाने व्हॅलेंटाईन विक अर्थात प्रेमाचा सप्ताह साजरा केला. त्याला उणेपुरे महिनाभराचा काळ लोटत असतानाच प्रेमाच्या भानगडींशी संबंधित अनेक प्रकरणे समोर येत आहेत. बुलडाण्यातूनही (Buldana) अतिशय धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. अल्पवयीन मुलगी प्रेमात पडल्याची माहिती घरच्यांपर्यंत पोहोचली. त्यांनी कायद्याचा धाक झुगारून तडकाफडकी मुलीचे लग्न ठरविले. ठरल्याप्रमाणे लग्न तोंडावर येऊन ठेपले. घरात पाहुणे मंडळींची लगबग सुरू होती. आई-बाबांची इच्छाम्हणून तिने मुकाट्याने हळदही लावून घेतली. त्यानंतर मात्र तिने अल्पवयीन प्रियकराची भेट घेतील. दोघांमध्ये प्रारंभिक संवाद झाला. दोघांनीही टोकाचे पाऊल उचलीत सोबतच फिनाईल प्राशन केले (Consumed Phenyl). त्याच अवस्थेत त्यांनी पोलिस स्टेशन गाठून संपूर्ण प्रकरणाची आणि फिनाईल प्यायल्याचीही माहिती दिली. हे सारे ऐकून पोलिसही हादरले (Even the police were shaken). दोघांनाही उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
हे संपूर्ण कथानक खामगाव येथील आहे. फिनाईल प्राशन करणारी मुलगी १६ वर्षांची तर मुलगा १७ वर्षांचा आहे. दोन्ही प्रेमवीरांनी ठाण्यात येत फिनाईल घेतले असल्याची माहिती दिली. त्यामुळे उपस्थित पोलिस कर्मचारीही चक्रावून गेले. शहर पोलिसांनी धावपळ करीत दोघांनाही जवळच्या रुग्णालयात नेऊन दाखल केले. महिला दिनी रात्री ही घटना घडल्याचे सांगितले गेले.
सविस्तर प्रकरण असे की, दोन्ही प्रेमवीर एकाच परिसरात राहतात. त्यांच्यात प्रेम फुलले. सोबत जगण्या –मरण्याच्या आणाभाकाही घेऊन झाल्या. याची कुणकुण लागताच पालकांनी तडकाफडकी दूरवरच्या रत्नागिरी येथील युवकासोबत लग्न ठरविले. तारीख ठरली, लग्नपत्रिका वाटल्या, नातेवाईक जमले. महिला दिनाच्या मुहूर्तावर हळदही लागली. घरात पाहुणे मंडळींचा राबता असतानाच उपवर मुलीने ‘त्याच्या’ सह फिनाईल घेतले. अश्या अवस्थेत दोघांनी पोलिस ठाणे गाठून हकीकत सांगितली. पोलिसांनी या दोघांना सामान्य रुग्णालयात दाखल केले.
आई-वडिलांविरोधात गुन्हा
मुलगी अज्ञानी असतानाही लग्न जोडले गेले असल्याने पोलिसांनी आईवडिलाविरुद्ध बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपासात सुरू आहे. या प्रकरणात पुढे येणाऱ्या माहितीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा