बारुद गोळा ठरतोय घातक मुलगा जखमी : तळेगाव येथील घटना

0

वर्धा. (WARDHA)जंगलांलगतच्या शेतांमध्ये वन्य प्राण्यांकडून (wild animals ) मोठ्या प्रमाणावर नासधूस सुरू आहे. शेतीचे मोठे नुसान होत असतानाही शेतकरी काहीच करू शकत नाही. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांकडून बारूद गोळ्याचा वापर केला जातो. कणक भिजवून बारूदाचा गोळा ठेवला जातो. प्राण्यांनी तो गोळा खाण्याचा प्रयत्न करताच तो फुटून प्राण्यांच्या तोंडाला गंभीर दुखापत होते. या प्रकारात अनेकदा प्राण्याच्या मृत्यूची देखील शक्यता असते. पण, पर्यायच नसल्याने पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी हा जीवघेना प्रकार करतात. असाच बारुदचा गोळा फुटल्याने मुलगा किरकोळ जखमी (boy was injured due to the bursting of gunpowder) झाला. ही घटना तळेगाव (Talegaon ) श्या.पंत येथील कब्रस्तान परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. तातडीने जखमी मुलावर उपचार करण्यात आले. तो किरकोळ जखमी झाल्याचे निष्पन्न झाल्याने साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला.

रवी निकम रा. तळेगाव असे जखमी युवकाचे नाव आहे. तळेगाव श्या.पंत परिसरतील शेतशीवारत जंगली डुकरांचा अगदी हैदोस सुरू आहे. त्यासोबतच अन्य जनावरांकडूनही शेतपिकांची नासधूस केली जात आहे. हिंस्त्र प्राण्यांपासून पिकांचे व पाळीव जनावरांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेताच्या बांधावर कणकीचा गोळा करुन त्यात बारुद भरुन ठेवले जातात. शहरातील कब्रस्तान परिसरात बारुदीचे काही गोळे पडलेले दिसून आले. जखमी रवी याला हे गोळे दिसले. त्याने कुतुहलापोटी हे गोळे नेमके कशाचे हे तपासण्यासाठी एक गोळा उजलून जमिनीवर जोराने आपटला. दरम्यान त्या गोळ्याचा स्फोट झाला. या स्फोटात रवीच्या डोक्याला आणि हाताला किरकोळ मार लागल्याने त्याला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तो धोक्याबार असल्याचे डोक्टरांनी सांगितल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. घटना उजेडात येताच पोलिस निरीक्षक आशिष गझबिये यांनी कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळ गाठून परिसराची पाहणी केली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिल्याचे समजते. अशाप्रकारे वन्य प्राण्यांना धोका पोहोचविणे बेकायदेशीर असून कारवाई देखील केली जाऊ शकते, असा इशारा ग्रामस्थांना देण्यात आला आहे.

 

चुबुक वडी आणि फ्लॉवर बटाटा रस्सा भाजी | Chubuk Wadi Recipe | Flower Batata Rassa Recipe | Ep 111