अमरावती. जिल्ह्यात (Amravati district) मोबाईल टॉवरच्या बॅटरी आणि कार्ड चोरीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत (battery and card theft of mobile towers are continuously coming to light). पोलिसांनी या चोऱ्या करणाऱ्यांवर लक्ष रोखले होते. एक एक धागा जोडत पोलिसांनी चोरट्यांचा मागमोस काढला. त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बॅटरी आणि कार्ड चोरून नेणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात यश आले आहे. या टोळीतील चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या (Four members of the gang were caught by the police) आहेत. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. आरोपींनी शहरात सात ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून अन्य जिल्ह्यांमधील चोरीट्या घटना देखील उघडकीस येण्याची शक्यता असून त्या दिशेने तपास केला जात आहे. आरोपींकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारी लक्झरी कार जप्त करण्यात आली आहे.
अ. आरीफ शे. तुराब रा. खोमई, मध्यप्रदेश, वसीम शहा लुकमान शहा रा. इकबाल कॉलनी, अमरावती, नितीन रामभाऊ श्रीराव व आनंद पतिराम काळे दोघेही रा. पाळा, ता. मोर्शी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार फरार असल्याचे सांगितले जात आहे. मोबाइल टॉवरच्या बॅटरी व कार्ड चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अचलपूर उपविभागात गस्त घालत असताना अ. आरीफ शे तुराब व त्याचे अन्य साथीदार मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे गुन्हे करित असून सध्या ते गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे त्यांनी शिरजगांव कसबा बस स्टॅंडजवळ सापळा रचून चारही आरोपींना अटक केली.
दिल्लीत चोरीच्या मालाची विक्री
अटक चारही आरोपींनी तिवसा पोलिस ठाण्यात नोंद दोन व कुऱ्हा, चांदूरबाजार, वरूड, मंगरूळ व नांदगाव खंडेश्वर पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या प्रत्येकी एक अशा एकूण सात गुन्हयांची कबुली दिली आहे. त्या सर्व चोरीची घटना मोबाईल टॉवरबाबतच्या आहेत. आरोपी हे रेकार्डवरील गुन्हेगार असून त्यांचेवर यापूर्वीसुध्दा चोरीचे गुन्हयांची नोंद आहे. आरोपींचा फरार साथीदार चोरीकेल्या बॅटरी व कार्ड आरोपींकडून कमी किमतीत विकत घेवून दिल्ली व इतर ठिकाणी विक्रीकरीता घेवून जात असल्याचे समोर आले आहे. आरोपींना तिवसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.