-सकारात्मक पत्रकारिता देणार 3. 50 लाखांचे पुरस्कार
नागपूर (Nagpur): पत्रकार आणि पत्रकारितेसाठी कृतिशील उपक्रम राबविणारी व्हॉईस ऑफ मीडिया’ (Voice of Media) संघटनेचा विस्तार वेगाने होत आहे. संघटनेने 26 हजार सभासदांचा टप्पा पार केला आहे. या संघटनेचे विदर्भ विभाग अधिवेशन रविवार, 16 एप्रिल रोजी किंग्जवे ऑडिटोरिअम (परवाना भवन) कस्तुरचंद पार्कजवळ नागपूर येथे होत आहे. उद्घाटन दुपारी 12 वाजता केंद्रीय भूपृष्ठवाहतूक व महामार्ग मंत्री ( nitin gadkari ) नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे राहतील. यावेळी विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष (hnsaraj ahir) हंसराज अहीर, मुख्य वक्ते म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाचे केंद्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर जोरगेवार, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्याध्यक्ष राजा माने, प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के यांची प्रामुख्याने उपस्थिती राहील. दुपारच्या दुसऱ्या सत्रात “बदलती पत्रकारिता आणि आव्हाने” यावर राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होत आहे. यात ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित , देवेंद्र गावंडे , शैलेश पांडे आदी मान्यवर सहभाग घेतील. तिसऱ्या सत्रात व्हॉईस ऑफ मीडियाच्या विविध विंगचे प्रदेश अध्यक्ष मनोगत आणि सादरीकरण करतील.
पत्रकारांच्या समस्यांवर चर्चा, उपायांवर मंथन होईल. संघटनेच्यामाध्यमातून सकारात्मक पत्रकारिता करणाऱ्या महिला, पुरुष पत्रकारांना 3.50 लाख रुपयांचे पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आनंद आंबेकर यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी देवनाथ गंडाटे, फईम खान,अजय तायवाडे, भोजराज नागपुरे, जितेंद्र धाबर्डे आदी पदाधिकारी हजर होते.
ज्येष्ठ पत्रकार, मालक, संपादकाचा सत्कार
यावेळी विजयबाबू दर्डा (माजी खासदार तथा एडिटर इन चीफ, लोकमत वृत्तपत्र समूह), श्रीधरराव सीताराम बलकी (चंद्रपूर), अनिल केशवराव पळसकर (बुलडाणा), वसंतराव ऋषीजी खेडेकर (बल्लारपूर), बाबूराव विठ्ठलराव परसावार (सिंदेवाही), रामभाऊजी नागपुरे, (सिर्सी, ता. उमरेड), शामराव मोतीराम बारई (ता. वडसा देसाईगंज), जि. गडचिरोली), विजय दत्तात्रय केंदरकर (अकोला), सुरज पाटील (यवतमाळ), विश्वंभर त्र्यंबक वाघमारे (बुलडाणा), | रमेश मारोतराव दुरुगकर (ता. साकोली, जि. भंडारा), भाऊराव पंढरीनाथ रामटेके (ता. लाखांदूर, जि. भंडारा) यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दरम्यान,100 हौशी कलावंत एकत्रित येऊन महाराष्ट्राभिमान जागविणाऱ्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमाची निर्मिती स्पार्क | जनविकास फाऊंडेशनने केली आहे. विदर्भातील 100 कलावंतांचा महाराष्ट्र संस्कृती दर्शन घडविणारा कार्यक्रम दुपारी 4.30 वाजता सादर होणार आहे.