पुणे-मुंबई महामार्गावर बस दरीत कोसळून १२ प्रवाशांचा मृत्यू

0

रायगडः पुणे-मुंबई महामार्गावर (जुन्या) खासगी बस दरीत कोसळून 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुमारे 25 प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास (Fatal Accident on Pune-Mumbai Old Highway) घडली. बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या खासगी बसमध्ये 40 प्रवासी होते. 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 25 प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमी प्रवाशांना दरीतील बसमधून बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पहाटे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्रीच पुण्याहून ही बस मुंबईला निघाली होती. दरम्यान, (eknath shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची तात्काळ दखल घेत मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, (Devendra Fadnavis) ‘सध्या 18 प्रवाशांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, 10 प्रवाशांना खोपोली आणि एका प्रवाशाला खासगी जकोटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले आहे. आतापर्यंत 25 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे.

वादक पथकाचा समावेश

दरम्यान, (raigad police)रायगड पोलिसांनी या अपघाताची माहिती देताना सांगितले की, खासगी (bus)बसमध्ये मुंबईतील गोरेगावमधील बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) प्रवास करीत होता. ते सर्वजण(pune) पुण्याचा कार्यक्रम संपवून (goregaon)गोरेगावला जात होते. त्यांच्यापैकी काही जण जखमी असल्याची माहिती आहे.

 

चुबुक वडी आणि फ्लॉवर बटाटा रस्सा भाजी | Chubuk Wadi Recipe | Flower Batata Rassa Recipe | Ep 111