महात्मा गांधी अर्थात मोहनदास करमचंद गांधी यांची आज ७५वी पुण्यतिथी आहे. हा दिवस महात्मा गांधींच्या अहिंसेच्या शिकवणीसाठी विशेष ओळखला जातो. हिंसेपेक्षा अहिंसा हे एक सर्वात मोठं शस्त्र आहे आणि त्या शस्त्राच्या आधारे मोठमोठी युद्ध बंदुकीशिवाय जिंकता येतात हे महात्मा गांधींनी जगाला पटवून दिलं. महात्मा गांधींना कोणी बापू म्हणूनही हाक मारतात. सत्य आणि अहिंसेचा मार्ग सर्वात सुंदर आणि खरा मार्ग आहे याची शिकवण महात्मा गांधी यांनी करुन दिली.
स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींनी राष्ट्रपिता या उपाधीने गौरवण्यात आलं. गांधीजींच्या प्रयत्नांनी देश १५ ऑगस्ट १९४७ साली स्वतंत्र झाला. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर काहीच दिवसात ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांचे निधन झाले. गांधीजींना नथुराम गोडसेने बिर्ला हाऊसमधील गांधी स्मृती येथे संध्याकाळी प्रार्थनेदरम्यान गोळ्या घातल्या. हा दिवस गांधीजींची पुण्यतिथी म्हणून इतिहासात कायमचा नोंदवला गेला.
गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. २ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस हा भारतात गांधी जयंती म्हणून आणि जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात राष्ट्रीय सुट्टी असते. गांधींना सामान्यतः अनौपचारिकपणे भारताचे राष्ट्रपिता मानले जाते.
महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणूनही संबोधले जाते. मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्यावरही त्यांच्या सत्य आणि अहिंसेच्या विचारसरणीचा खूप प्रभाव होता.
महात्मा गांधींनी आफ्रिकेत सलग २१ वर्षे अन्याय आणि वर्णद्वेषाविरुद्ध अहिंसक लढा दिला, ज्याची किंमत केवळ आफ्रिकेतच नव्हे तर भारतातही ब्रिटिशांना भोगावी लागली.
भारतीयांबद्दलच्या वंशभेद, असमानता यांना सामोरे गेल्यावर गांधींनी या अन्याया विरूद्ध आवाज उठवण्यास व समाजात स्वत:चे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली.
भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू करण्यात येणार होता, या कायद्याला विरोध करणाऱ्या भारतीयांना मदत करण्यासाठी गांधींनी आपले दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काही काळासाठी वाढवले.हा कायदा रद्द करण्यात जरी ते अयशस्वी ठरले तरी यामुळे भारतीयांवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात त्यांची चळवळ यशस्वी झाली.
१८९४ मध्ये दक्षिण आफ्रिका भारतीय काँग्रेसची स्थापना केली व याद्वारे दक्षिण आफ्रिकेतील विखुरलेल्या भारतीयांना त्यांनी एका राजकीय पक्षात परावर्तित केले.१९०६ मध्ये ट्रान्सवाल सरकारने एका नवीन कायद्याची घोषणा केली.या कायद्यानुसार तेथील प्रत्येक भारतीयाला स्वतःची नोंदणी करणे बंधनकारक झाले होते.
महात्मा गांधी यांची माहिती थोडक्यात
नाव | मोहनदास करमचंद गांधी |
वडिलांचे नाव | करमचंद उत्तमचंद गांधी |
आईचे नाव | पुतळीबाई करमचंद गांधी |
जन्मतारीख | २ ऑक्टोबर १८६९ |
जन्म ठिकाण | पोरबंदर,गुजरात |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
धर्म | हिंदू |
जात | गुजराती |
शिक्षण | बॅरिस्टर |
व्यवसाय | वकील, राजकारणी, कार्यकर्ते, लेखक |
पत्नीचे नाव | कस्तुरबा गांधी |
मुलांचे नाव | हरिलाल, मणिलाल, रामदास, देवदास (४ पुत्र) |
मृत्यू | ३० जानेवारी १९४८ |
मृत्यूचे ठिकाण | दिल्ली, भारत |
३० जानेवारी 19४८ रोजी नथुराम गोडसेनी महात्मा गांधींची हत्या केली होती. त्यांना 3 गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्याच्या तोंडातून शेवटचे शब्द बाहेर पडले ते म्हणजे ‘हे राम’.
गांधींच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी दिल्लीतील राजघाट येथे बांधण्यात आली. वयाच्या ७९व्या वर्षी महात्मा गांधींनी तमाम देशवासीयांचा निरोप घेतला.
३० जानेवारीला पाळला जातो हुतात्मा दिन
भारतात ३० जानेवारी हा शहीद दिन म्हणून साजरा करतात. एके ठिकाणी बापूंची पुण्यतिथी शहीद दिन म्हणून साजरी करून, देश महात्मा गांधींना आदरांजली वाहतो. यावेळी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री दिल्लीतील राजघाटावर गांधीजींच्या समाधीवर पोहोचतात आणि गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहतात. तर दुसरीकडे देशाच्या सशस्त्र दलातील हुतात्म्यांना अभिवादन केले जाते. बापूंच्या स्मरणार्थ आणि शहीदांच्या स्मरणार्थ देशभरात दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.
२३ मार्चचा हुतात्मा दिन आणि या दिवसात काय आहे फरक
३० जानेवारी व्यतिरिक्त, २३ मार्च हा देखील भारतात शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. दोन वेगवेगळ्या तारखांना हुतात्मा दिन साजरा करण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. पण दोन्ही हुतात्मा दिनात फरक आहे. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींची हत्या झाली, तर स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. म्हणूनच अमर शहीद दिन २३ मार्च रोजी अमर शहीदांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.