मृत्युपश्चात अहवाल पॉझिटिव्ह ; वाशिमध्ये खळबळ
वाशिम. जिल्ह्यातील ‘एच 3 एन 2’ बाधित सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे ) Death of a seven-year-old child infected with ‘H3N2’). त्यच्यावर अकोला शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान प्रकृती खालावत जाऊन त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर नमुने तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या घटनेनंतर वाशिमसह अकोला जिल्ह्यात (Akola district including Washim) खळबळ उडाली आहे. वातावरणातील अचानक बदलामुळे व्हायरलच्या तापाने डोकेदुखी वाढविली आहे. घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. काही रुग्णांचा ताप आठवडाभर, तर खोकला दोन आठवड्यांच्या वर जात असल्याने ‘एच३एन२’चा धोका वाढला (risk of H3N2 has increased ) आहे. आजार बळावत असले तीर धाबरून घाण्याचे कोणतेही कारण नाही. आरोग्याची काळजी घ्या, ताप येताच तत्काळ वैद्यकीय उपचार करून घ्या, कोरोना संकटात पाळलेल्या त्रिसूत्रीचा अवलंब करा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
सात वर्षीय मुलाला तीव्र ताप असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संशयामुळे त्याची तपासणी करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबमध्ये त्याचा ‘एच३एन२’ अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. एच 3 एन 2 संसर्गात वाढ होण्याची दोन मोठी कारणे सांगण्यात येत आहेत. पहिले म्हणजे कोरोनामुळे लोकांची इम्युनिटी कमी होऊन असंतुलित झाली आहे. दुसरे, एच 3 एन 2 विषाणूने रूप बदलले. विषाणूतील या बदलामुळे संसर्ग वाढला आहे. त्यावर उपाय म्हणजे कोरोना कालातील गाइडलाइनचे कठोर पालन करावे लागेल. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग बचावाची सर्वात चांगली पद्धत आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. जास्त दिवस खोकला आणि सर्दी राहिल्यास डॉक्टरांकडे जा. एच 3 एन 2 एनफ्लुएंझावर अजून कोणतीही लस नाही. यावरील उपचारात अँटिव्हायरल औषधींचा वापर होतो. आयएमएने एच 3 एन 2 मध्ये डॉक्टरांना अँटिबायोटिक औषधींचा वापर न करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांचा आहे. एच3एन2 विषाणूचा सर्वाधिक धोका मुले, वृद्ध आणि आधीपासून आजारांनी ग्रस्त लोकांना आहे. दीर्घ काळ सर्दी-खोकला राहिल्यास ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांनी डॉक्टरकडे त्वरित जावे. अवयव प्रत्यारोपण करून घेणारे, टीबी आणि कॅन्सरग्रस्तांनी एच 3 एन 2 च्या संसर्गापासून सावध राहणे आवश्यक आहे.